आयसीसीच्या सहापट! BCCI कडून विश्वविजेत्या संघाला १३१ कोटींचे बक्षीस जाहीर; कोणाला किती मिळणार? जाणून घ्या

BCCI 131 crore prize money Team India: टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या विजयानंतर बीसीसीआयने १३१ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. मुख्य खेळाडू, राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये या रकमेचे वाटप कसे होणार? वाचा सविस्तर माहिती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:10 IST2026-03-10T12:09:42+5:302026-03-10T12:10:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
BCCI 131 crore prize money: Six times the ICC! bcci announces 131 crore cash reward 6 crore more than 2024 t20 wc | आयसीसीच्या सहापट! BCCI कडून विश्वविजेत्या संघाला १३१ कोटींचे बक्षीस जाहीर; कोणाला किती मिळणार? जाणून घ्या

आयसीसीच्या सहापट! BCCI कडून विश्वविजेत्या संघाला १३१ कोटींचे बक्षीस जाहीर; कोणाला किती मिळणार? जाणून घ्या

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये न्यूझीलंडला धूळ चारून तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने आपला खजिना उघडला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियासाठी १३१ कोटी रुपयांच्या भव्य इनामी रक्कमेची घोषणा केली आहे. ही रक्कम २०२४ मधील बक्षीसापेक्षाही मोठी आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेली ही रक्कम केवळ खेळाडूंसाठीच नाही, तर संपूर्ण टीम मॅनेजमेंटसाठी आहे. याचे वाटप साधारणपणे अशाप्रकारे केले जाण्याची शक्यता आहे. मुख्य १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ ते ७ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. संघात असलेल्या ४ राखीव खेळाडूंनाही १ ते २ कोटींचा हिस्सा मिळेल. मुख्य प्रशिक्षक आणि इतर महत्त्वाच्या प्रशिक्षकांना (उदा. बॅटिंग, बॉलिंग कोच) मोठे मानधन दिले जाईल. तसेच फिजियो, ट्रेनर, थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट आणि इतर मदतनीस कर्मचाऱ्यांमध्ये उर्वरित रक्कम विभागली जाईल.

निवड समितीच्या सदस्यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल बोनस दिला जाणार आहे. 

ICC चे बक्षीस वेगळे
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केल्यानंतर, भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेजाहीर केलेल्या स्पर्धेच्या बक्षीस रकमेची रक्कम २.३४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (२१.५ कोटी रुपये) मिळवले आहेत. तर उपविजेत्या न्यूझीलंडला १.१७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (१०.७५ कोटी रुपये) मिळाले. टीम इंडियाला या व्यतिरिक्त बीसीसीआयची रक्कम मिळणार आहे. 

२०२४ मध्ये किती दिलेले...
२०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा तत्कालीन सचिव जय शाह यांनी १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, यंदा ही रक्कम १३१ कोटी रुपयांवर नेण्यात आली आहे.

Web Title : BCCI ने विश्व कप विजेताओं को ₹131 करोड़ दिए; वितरण विवरण यहाँ।

Web Summary : बीसीसीआई ने विश्व कप जीतने पर भारतीय टीम को ₹131 करोड़ का तोहफा दिया, जो आईसीसी के पुरस्कार से अधिक है। खिलाड़ियों को ₹5-7 करोड़ मिल सकते हैं। टीम प्रबंधन, कोचों और सहायक कर्मचारियों को भी उदारतापूर्वक पुरस्कृत किया जाएगा।

Web Title : BCCI awards World Cup winners ₹131 crore; distribution details here.

Web Summary : BCCI gifts ₹131 crore to the Indian team for winning the World Cup, exceeding ICC's prize. Players may receive ₹5-7 crore each. The team management, coaches, and support staff will also be rewarded generously for their contribution.