Join us

IND vs PAK: भारत विरूद्ध पाकिस्तानपेक्षा ॲशेस मालिका मोठी, इंग्लंडच्या बार्मी आर्मीचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार

यूएईच्या धरतीवर सुरू असलेल्या आशिया चषकात रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 13:23 IST

Open in App

नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर सुरू असलेल्या आशिया चषकात (Asia Cup 2022) रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने होते. अवघ्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या या सामन्यात अखेरच्या षटकात पाकिस्तानने शानदार विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानला 182 धावांचे तगडे आव्हान दिले होते. पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान (71), मोहम्मद नवाज (42) तर आसिफ अलीने केवळ 8 चेंडूंत 16 धावांची महत्त्वाची खेळी केली. पाकिस्तानने सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवला आहे.

दरम्यान, अनेक क्रिकेट चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी या रोमहर्षक सामन्याचा आनंद घेतला. तर पाकिस्तानकडून पराभव झाल्यामुळे भारतीयांची मने दुखावली आहेत. अशातच इंग्लंडच्या 'बार्मी आर्मी'ने दोन्ही देशातील चाहत्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान विरूद्ध भारत या सामन्यापेक्षा शेस मालिका प्रसिद्ध असल्याचा सूर बार्मी आर्मीचा आहे. "शेस >भारत विरुद्ध पाकिस्तान असो," असे सूचक विधान करून बार्मी आर्मीने भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

इंग्लंडची बार्मी आर्मी नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असते. आता पुन्हा एकदा बार्मी आर्मी चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी याचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

 

टॅग्स :एशिया कप 2022अ‍ॅशेस 2019भारत विरुद्ध पाकिस्तानइंग्लंडभारत
Open in App