Bangladesh vs Afghanistan Live Streaming Asia Cup 2025 When Where To Watch 9 th Match : आशिया चषक स्पर्धा ही हळूहळू सुपर फोरच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अबुधाबीच्या मैदानात 'ब' गटातील बांगलादेशचा संघ हा अफगाणिस्तान विरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेशसाठी 'करो वा मरो'ची लढत
स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी अफगाणिस्तानच्या तुलनेत बांगलादेशच्या संघासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे. हाँगकाँग विरुद्धच्या विजयानंतर श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशच्या संघाला पराभवाचा दणका दिला होता. आता तिसरा अन् अखेरचा सामना गमावला तर त्यांना गाशा गुंडाळून घरी परतावे लागेल. दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ सलग दुसऱ्या विजयासह सुपर फोरमधील प्रवेश निश्चित करण्यासाठी मैदानात उतरेल. इथं एक नजर टाकुयात सामना कुठं अन् कधी रंगणार? कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर....
BAN vs AFG यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० स्पर्धेत आतापर्यंत १२ सामने खेळवण्यात आले आहेत. यात ७ वेळा अफगाणिस्तानच्या संघाने मैदान मारलं आहे. बांगलादेशच्या संघाने फक्त ५ सामने जिंकले आहेत. ही आकडेवारी बांगलादेशच्या संघावरील दबाव आणखी वाढवणारी आहे.
कधी अन् कुठं रंगणार सामना?
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ स्पर्धेतील नववा सामना मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८:०० वाजता (IST) खेळवला जाईल. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगणार आहे.
भारतामध्ये ऑनलाइन थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
हा सामना भारतात Sony Liv अॅप आणि वेबसाईटवर थेट पाहता येईल. याशिवाय फॅनकोडवरही सामना Live Streaming साठी उपलब्ध असेल.
भारतामध्ये टीव्हीवर थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
हा सामना भारतात Sony Sports 1 आणि Sony Sports 5 चॅनेल्सवर थेट प्रसारित होईल.हिंदी समालोचनासाठी Sony Sports 3,
तर तमिळ आणि तेलुगू समालोचनासाठी – Sony Sports 4 वर क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
Web Title: Bangladesh vs Afghanistan Live Streaming Asia Cup 2025 When Where To Watch Match 9 On TV And Online Know Both Team Head To Head Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.