T20 World Cup स्पर्धेतून बांगलादेश खरंच OUT? त्यांच्या जागी ICC कोणत्या संघाला देणार संधी?

 BCB कडून ICC वर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:36 IST2026-01-22T17:34:31+5:302026-01-22T17:36:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Bangladesh Ruled Out Of T20 World Cup 2026 After ICC Warning Scotland May Be New Team Announced Soon | T20 World Cup स्पर्धेतून बांगलादेश खरंच OUT? त्यांच्या जागी ICC कोणत्या संघाला देणार संधी?

T20 World Cup स्पर्धेतून बांगलादेश खरंच OUT? त्यांच्या जागी ICC कोणत्या संघाला देणार संधी?

T20 World Cup  Bangladesh Ruled Out Of T20 World Cup 2026 After ICC Warning : भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बांगलादेशचा संघ बाहेर पडला आहे, अशी माहिती समोर येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या कारणास्तवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने श्रीलंकेत खेळवण्याची विनंती केली होती. पण आयसीसीने त्यांची मागणी फेटाळली. त्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी ICC वर आरोप करत भारतात  खेळण्यास तयार नाही, या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 BCB कडून ICC वर आरोप

बांग्लादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल म्हणाले आहेत की, "आम्ही ICC सोबत चर्चा करत राहू. आम्ही वर्ल्ड कप खेळू इच्छितो, पण भारतात नाही. ICC च्या बैठकित काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले. मुस्तफिजुरचा विषय हा एकट्यापुरता मर्यादीत नाही. भारतीय क्रिकेट बोर्डाने एकतर्फी हा निर्णय घेताल. ICCने आमची भारतातील सामने  दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी नाकारली. त्यामुळेच आम्हाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. 

पंतप्रधानांनंतर गौतम गंभीरच...! शशी थरूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर टीम इंडियाचा कोचनं असा दिला रिप्लाय

ICC नव्या संघाची घोषणा करणार? बांगलादेशच्या जागी कुणाला मिळणार संधी

टी-२० वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश यांच्यातील वादग्रस्त मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बीसीसीआयच्या आदेशानंतर KKR ने बांगलादेशचा वेगवगान गोलंदाज  मुस्तफिजुर रहमानला IPL मधून बाहेरचा रस्ता दाखवल्यापासून या वादाला सुरुवात झाली. भारतात बांगलादेशच्या खेळाडूंना सुरक्षित वाटत नाही, असे सरकार आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. पण ICC नं यात काहीच तथ्य नाही, असे स्पष्ट करत त्यांचे सामने श्रीलंकेत स्थलांतरित करण्यास साफ नकार दिला. 

नवीन टीमसाठी संधी

टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा  ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेतील मैदानात खेळवण्यात येणार आहे. यात एकूण २० संघ सहभागी होतील. बांग्लादेशचा संघ या स्पर्धेत ग्रुप-सी मध्ये ठेवले होते. या गटात इटली, वेस्ट इंडीज, नेपाळ आणि इंग्लंड या संघाचा समावेश आहे. बांगलादेशचा संघ या स्पर्धेत खेळला नाही तर त्यांच्या जागी स्कॉटलंडच्या संघाला संधी मिळू शकते. ICC नं अद्याप यासंपूर्ण प्रकरणात अधिकृरित्या आपली भूमिका स्पष्ट केलेले नाही. बांगलादेशच्या ठाम भूमिकेनंतर ICC रिव्ह्यू घेणार की, बांगलादेशचा पत्ता कट करून ते खरंच वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नव्या संघाला संधी देणार ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title : क्या बांग्लादेश टी20 विश्व कप से बाहर? आईसीसी किसे मौका दे सकता है?

Web Summary : सुरक्षा चिंताओं और मैच स्थानों पर आईसीसी के साथ असहमति के कारण बांग्लादेश टी20 विश्व कप से हट सकता है। स्कॉटलैंड उनकी जगह ले सकता है। आईसीसी ने अभी तक आधिकारिक तौर पर कोई टिप्पणी नहीं की है।

Web Title : Bangladesh Possibly OUT of T20 World Cup; Who Gets the Chance?

Web Summary : Bangladesh may withdraw from the T20 World Cup due to security concerns and disagreements with the ICC regarding match locations. Scotland could replace them. The ICC is yet to officially comment.