Join us

Good News : 'या' क्रिकेटपटूच्या घरी हलला पाळणा; सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 15:35 IST

Open in App

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. रमजानच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 24 एप्रिलला त्याला कन्यारत्न प्रात्पी झाली. आज त्यानं याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. शकिबनं त्याच्या मुलीचं नाव इरम हसन असे ठेवले आणि त्याचा अर्थ जन्नत असा होतो. शकिबच्या पहिल्या मुलीचं नाव अलायना औब्रेय हसन असे आहे. 

शकिब आणि त्याची पत्नी शिशीर यांची लंडनमध्ये 2010साली कौंटी क्रिकेट स्पर्धेदरम्यान भेट झाली. कौंटी क्रिकेटमध्ये खेळणारा शकिब हा पहिला बांगलादेशी खेळाडू आहे. शिशीर ही लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेली होती. भेटीनंतर दोघ एकमेकांना आवडू लागले. दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर शकिब व शिशीर यांनी 2012मध्ये लग्न केलं. तीन वर्षानंतर या जोडीला कन्यारत्न प्राप्ती झाली.   

Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार 

Herschelle Gibbs करणार 'त्या' ऐतिहासिक खेळीच्या बॅटचा लिलाव 

न्यूझीलंडची महिला खेळाडू लै डेंजर; रोहित, सचिनसह कुणालाच नाही जमला हा पराक्रम

विराट कोहलीनं फिल्मी स्टाईलनं दिल्या पत्नी अनुष्का शर्माला शुभेच्छा

टीम इंडियानं 42 महिन्यांनी गमावलं अव्वल स्थान; सर्वाधिक काळ टॉपवर राहणारा सातवा संघ! 

 

टॅग्स :बांगलादेश