India A Beat Bangladesh A Enter Final ACC Mens Asia Cup Rising Stars 2025 : रायझिंग स्टार टी-२० आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमधील भारत-बांगलादेश यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९४ धावा करत भारतासमोर १९५ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानेही १९४ धावा करत सामना बरोबरीत नेला. अखेरच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी १६ धावांची गरज होती. पहिल्या २ चेंडूत २ धावा काढल्यानंतर अखेरच्या ४ चेंडूत १४ धावांची गरज असताना आशुतोष शर्मानं षटकार आणि चौकार मारत भारतीय संघाला विजयाचाच्या जवळ आणले. २ चेंडूत ४ धावांची गरज असताना तो बोल्ड झाला. अखेरच्या चेंडूवर भारतीय संघाला ४ धावांची गरज असताना हर्ष दुबे मैदानात उतरला. त्याने ३ धावा काढत सामना बरोबरीत नेला.
Web Summary : India A and Bangladesh A tied in the ACC Men's Asia Cup Rising Stars semifinal. Bangladesh set a target of 195, which India matched, leading to a thrilling super over finish. The match was a nail-biter.
Web Summary : एसीसी मेन्स एशिया कप राइजिंग स्टार्स सेमीफाइनल में भारत ए और बांग्लादेश ए का मुकाबला टाई रहा। बांग्लादेश ने 195 रनों का लक्ष्य रखा, जिसे भारत ने बराबर किया, जिसके कारण रोमांचक सुपर ओवर हुआ। मैच बहुत रोमांचक था।