India A Beat Bangladesh A Enter Final ACC Mens Asia Cup Rising Stars 2025 : रायझिंग स्टार टी-२० आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमधील भारत-बांगलादेश यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या मोबदल्यात १९४ धावा करत भारतासमोर १९५ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानेही १९४ धावा करत सामना बरोबरीत नेला. त्यामुळे पहिल्यांदाच या स्पर्धेतील सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशुतोष शर्मानं आस वाढवली, पण हिरो होण्याची संधी गमावली
अखेरच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी १६ धावांची गरज होती. पहिल्या २ चेंडूत २ धावा काढल्यानंतर अखेरच्या ४ चेंडूत भारतीय संघालाचा विजयासाठी १४ धावांची गरज होती. आशुतोष शर्मानं षटकार आणि चौकार मारत भारतीय संघाला विजयाचाच्या जवळ आणले. तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारल्यावर पुढच्या चेंडूवरही त्याने मोठा फटका मारला. बांगलादेशी खेळाडूंने त्याचा झेल सोडला आणि भारताच्या खात्यात चार धावा जमा झाल्या. IPL मध्ये दिल्लीच्या संघाला अशक्यप्राय सामना जिंकून देणारा पठ्ठ्या भारतीय संघाला फायनलचं तिकीट मिळवून देत हिरो ठरेल, असे चित्र निर्माण झाले . पण २ चेंडूत ४ धावांची गरज असताना तो बोल्ड झाला. जीवनदान मिळून हिरो होण्याची निर्माण झालेली संधी त्याने गमावली.
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
हर्ष दुबेनं कसा बसा सामना टाय केला, पण शेवटी बांगलादेशनेच मारली बाजी
अखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना हर्ष दुबे मैदानात उतरला. त्याने मोठा फटका मारला पण सीमारेषेबाहेर चेंडू धाडण्यात तो अपयशी ठरला. बांगलादेशच्या क्षेत्रक्षकांनी गडबड घोटाळा केल्यामुळे जिथ फक्त २ धावा मिळायला हव्या तिथं भारतीय संघाला ३ धावा मिळाल्या. हर्ष दुबे आणि नेहाल वढेरा जोडीनं सामना टाय करत फायनलची आस कायम ठेवली. पण शेवटी सुपर ओव्हरमध्ये खेळ बांगलादेशच्या बाजूनं फिरला.