Babar Azam Duck In 2nd ODI : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार बॅटर बाबर आझम सध्या धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे टी-२० संघातून त्याचा पत्ता आधीच कट झालाय. त्यात आता वनडेतही त्याचा फ्लॉप शो दिसून आला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात त्याने ४७ धावांची खेळी केली. पण दुसऱ्या वनडेत त्याच्या पदरी भोपळा पडला. त्यामुळे इथंही त्याच्यावर दबाव निर्माण झाला आहे. बाबर आझमचा टी-२० संघातून पत्ता कट झाल्यामुळे हिटमॅन रोहित शर्माचा छोट्या फॉर्मेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढण्यापासून तो लांब राहिला. आता वनडेतील फ्लॉप शोमुळे शुबमन गिलची बादशाहत सेफ राहिल, असे दिसून येते. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मागच्या ६३ डावात शतकी दुष्काळ, जी मोठी खेळी आली ती नेपाळविरुद्ध
वनडेत बाबर आझमला मागील ६३ डावात एकही शतक झळकावता आलेले नाही. २०२३ मध्ये आशिया कप स्पर्धेतील वनडेत तेही नेपाळविरुद्ध त्याच्या भात्यातून शेवटचं शतक पाहायला मिळालं होते. या सामन्यात त्याने १५१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो शतक ठोकण्यात अपयशी ठरलाय.
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
७१९ दिवसांनी वनडेत पाचव्यांदा ओढावली ही नामुष्की
वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात जायडन सीन्स याने बाबर आझमचा त्रिफळा उडवला. ७१९ दिवसांनी त्याच्यावर वनडेत शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. क्रिकेटच्या या प्रकारात पाचव्यांदा त्याच्यावर ही वेळ आलीये. याआधी ऑगस्ट २०२३ मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.
रोहित पाठोपाठ शुबमन गिलची 'बादशाहत' ?
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वलस्थानी आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याने या प्रकारातून निवृत्तीची घोषणा केलीये. पण अजूनही तो टॉपला आहे. बाबर आझम हिटमॅन रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे. पण पाकिस्तानच्या टी-२० संघातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे रोहित शर्माचा रेकॉर्ड सेफ झोनमध्ये आलाय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करून आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर होण्याची संधी बाबर आझमला होती. शुबमन गिलला मागे टाकून तो पुन्हा वनडेत बादशात मिरवणार का? अशी चर्चाही रंगली. पण वेस्ट इंडिज विरुद्धच्या त्याच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलचे नंबर स्थानही सेफ झाल्याचे दिसते.