Join us

PAK vs SA : DRS ड्रामा! मग LIVE मॅचमध्ये रमीझ राजानं काढली बाबर आझमची लाज; व्हिडिओ व्हायरल

नेमकं काय घडलं? बाबर आझमसंदर्भात माजी पाक क्रिकेटर काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 20:47 IST

Open in App

PAK vs SA 1st Test Babar Azam Insulted During Live Match By Ramiz Raja  : पाकिस्तानच्या संघाने घरच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ सामन्यांच्या मालिकेसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यंदाच्या सत्राची सुरुवात केली आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना लाहोरच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या दिवसाअखेर ५ विकेटच्या मोबदल्यात ३१३ धावा काढल्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

विकेट वाचवण्यासाठी बाबरनं खेळ खेळला, पण...

या सामन्यातून पाकिस्तानचा बब्बर शेर बाबर आझम बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. पण त्याच्या पदरी अपयशच आले. पहिल्या डावात तो २३ धावांवर पायचित होऊन तंबूत परतला. मैदानातील पंचांनी बाद ठरवल्यावर या पठ्ठ्यानं आपली विकेट वाचवण्यासाठी रिव्ह्यू घेण्याचा जो खेळ खेळला तोही फसला. त्याआधीच समालोचन करणाऱ्या  रमीझ राजांनी बाबर आझमची Live मॅचमध्ये लायकी काढल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी केलेल्या कमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...

नेमकं काय घडलं? बाबर आझमसंदर्भात माजी पाक क्रिकेटर काय म्हणाला?

पाकिस्तानच्या डावातील ४९ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा सायमन हार्मर याच्या गोलंदाजीवर बाबर आजम यष्टीसमोर सापडला. गोलंदाज आणि आफ्रिकेच्या ताफ्यातील खेळाडूंनी अपील केल्यावर पंचांनी बाबरला आउट दिलं. मग बाबर आझमनं पंचाच्या निर्णायाला आव्हान करत रिव्ह्यू घेतला. ते पाहून कॉमेंट्री करणाऱ्या रमीझ राजाने आउट आहे, पण तो नौटंकी करतोय, अशी कमेंट केली. त्यांची ही कमेंट चर्चेचा विषय ठरत आहे.

लाहोरच्या मैदानात पहिल्या दिवसाच्या खेळात चौघांची अर्धशतके

पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या ताफ्यातील सलामीवीर इमाम उल हक याने ९३ धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. याशिवाय पाकिस्तानी कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या शान मसूद याने १४७ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला  त्यावेळी मोहम्मद रिझवान ६२ (१०७) आणि सलमान अली आगा ५२ (८३) यांनी नाबाद अर्धशतके झळकावली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Babur: A Brief Overview of the Mughal Emperor

Web Summary : Babur, the founder of the Mughal Empire, is simply mentioned repeatedly. The text provides no information beyond the emperor's name being echoed.
टॅग्स :बाबर आजमजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धापाकिस्तानद. आफ्रिका