Join us
Daily Top 2Weekly Top 5

चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एक शतक ठोकले, शेवटच्या सामन्यात असभ्य कृत्य भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:20 IST

Open in App

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याला मैदानात राग काढल्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. मैदानातील असभ्य वर्तनाबद्दल आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली आहे. रावळपिंडीच्या मैदानात श्रीलंके विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात बाबर आझम चांगली सुरुवात मिळाल्यावर अर्धशतकाच्या आत माघारी फिरला. विकेट गमावल्यावर त्याने रागाच्या भरात स्टंपवर बॅट मारली होती. याप्रकरणी आयसीसीने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ICC नं कोणत्या कलमाअंतर्गत बाबर आझमवर केली कारवाई?

ICC नं ३१ वर्षीय पाकिस्तानी बॅटरवर अचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. ज्यात मैदानातील असभ्य कृतीनं साहित्याची नुकसान पोहचवल्या प्रकरणी त्याच्यावर दंडात्मक करावा झाली आहे. बाबर आझमला सामन्याच्या मानधनातील १० टक्के रक्कम कपातीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुणही जमा झाला आहे.  

Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका

बाबरनं काय चूक केली?

भारत-श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रावळपिंडीच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानच्या डावातील २१ व्या षटकात जेफ्री वेंडरसे याने बाबर आझमला क्लीन बोल्ड केले. ५२ चेंडूचा सामना करून ३४ धावांवर तंबूचा रस्ता धरण्याआधी पाकिस्तानी बॅटरनं स्टंपवर बॅट मारत राग व्यक्त केला. या प्रकरणात ICC चे सामनाधिकारी अली नक्वी यांनी बाबर आझमला शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानी बॅटरनं आपली चूक मान्य केल्यामुळे यासंदर्भात औपचारिक सुनावणी झाली नाही.

 श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एक शतक ठोकले 

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत बाबर आझमनं ३ सामन्यात एका शतकाच्या मदतीने १६५ धावा केल्या. फखर झमान याच्या पाठोपाठ सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर राहिला. शतकी खेळीनंतर धावांचा संघर्ष संपल्याचे चित्र निर्माण झाले असताना पदरी निराशा आल्यावर त्याने मैदानात राग काढल्याचे पाहायला मिळाले.  पाकिस्तानच्या संघाने श्रीलकेवरिरुद्धची मालीका ३-० अशी जिंकली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Babar Azam Fined by ICC for Hitting Bat on Stumps

Web Summary : Babar Azam faced ICC action for his on-field misconduct during a match against Sri Lanka. Frustrated after losing his wicket, he hit the stumps with his bat. The ICC fined him 10% of his match fee and issued a demerit point.
टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानश्रीलंकाआयसीसी