Babar Azam Equal Virat Kohli Record : पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडल्यावर आता विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानच्या मैदानात सुरु असलेल्या तिरंगी टी-२० मालिकेत बाबर आझमने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळीसह विराट कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी साधली. आता आणखी एका अर्धशतकासह तो रोहित पाठोपाठ आता विराट कोहलीला मागे टाकण्याच्या उंबरठ्यावर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकाचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. किंग कोहलीनं छोट्या फॉरमॅटमध्ये ३८ अर्धशतके झळकावली आहेत. २०१० ते २०२४ या कालावधीत १२५ सामन्यातील ११७ डावात किंग कोहलीनं ही कामगिरी नोंदवली होती. बाबर आझमनं या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. १३४ व्या सामन्यातील १२७ व्या डावात बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय टी-२० मधील ३८ वे अर्धशतक झळकावले. आता एका अर्धशतकासह तो हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करू शकतो.
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
याआधी रोहित शर्माला मागे टाकत सेट केला आहे T20I मध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बाबर आझमच्या नावे आहे. रोहित शर्माला मागे टाकत तो या यादीत अव्वलस्थानी पोहचला होता. बाबर आझमनं १३४ सामन्यात ३८ अर्धशतकासह ३ शतकांच्या मदतीने ४३९२ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मानं आपल्या टी-२० कारकिर्दीत १५९ सामन्यात ४२३१ धावा केल्या आहेत. यात त्याने ३२ अर्धशतकासह ५ शतके झळकावली आहेत.
Web Summary : Babar Azam matched Virat Kohli's record of 38 T20I half-centuries during a match against Zimbabwe. He surpassed Rohit Sharma in T20I runs. Azam scored 4392 runs with 3 centuries. Kohli achieved his record in 117 innings.
Web Summary : बाबर आज़म ने जिम्बाब्वे के खिलाफ मैच में विराट कोहली के 38 टी20 अर्धशतकों के रिकॉर्ड की बराबरी की। उन्होंने टी20 अंतरराष्ट्रीय में रोहित शर्मा को पीछे छोड़ दिया। आज़म ने 3 शतकों के साथ 4392 रन बनाए। कोहली ने 117 पारियों में यह रिकॉर्ड बनाया।