Babar Azam Broke The World Record With Fastest 12000 T20 Runs : पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धेत बाबर आझमनं टी-२० क्रिकेटमधील नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमासह मिरवणारा पाकस्तानी बॅटर आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने १२ हजार धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज ठरला आहे. त्याने कॅरिबियन स्टार ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे. या यादीत किंग कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाबर आझमचा मोठा पराक्रम, गेलसह विराट कोहलीला टाकले मागे
बाबर आझमने पेशावर जाल्मी विरुद्ध कराची किंग्स यांच्यातील सामन्यात ५१ चेंडूत ८७ धावांची खेळी करत टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा पल्ला पार केला. ३३८ व्या डावात त्याने ही कामगिरी करून दाखवली. ख्रिस गेलनं ३४३ चेंडूत हा पल्ला गाठला होता. विराट कोहलीनं ३६० डावात टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्याचा रेकॉर्ड असून डेविड वॉर्नर ३६८ डावात इथपर्यंत मजल मारली होती.
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन...
टी-२० मध्ये सर्वात कमी डावात १२ हजार धावा करणारे फलंदाज
- ३३८ डाव - बाबर आझम
- ३४३ डाव - ख्रिस गेल
- ३६० डाव - विराट कोहली
- ३६८ डाव - डेविड वॉर्नर
बाबर आझम टी-२० मध्ये १२ हजार धावा करणारा एकंदरीत १२ वा आणि पाकिस्तानचा दुसरा फलंदाज आहे. याआधी शोएब मलिक याने हा डाव साधला होता. आता त्याच्या नजरा या फाफ ड्युप्लेसिसच्या रेकॉर्डवर आहेत. त्याच्या खात्यात टी-२० क्रिकेटमध्ये १२०३१ धावांची नोंद आहे. ११ धावा करताच बाबर आझम त्याला ओव्हरटेक करेल.
इथं बाबरपेक्षा भारी आहे विराट कोहली
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल अजूनही अव्वल आहे. त्याने छोट्या फॉरमॅटमध्ये २००५ ते २०२२ या कालावधीत १४५६२ धावा काढल्या आहेत. या यादीत विराट कोहली १३ हजार पेक्षा अधिक धावांसह बाबर आझमच्या पुढे आहे.