Babar Azam Breaks Rohit Sharma’s World Record : पाकिस्तानचा संघातील अनुभवी फलंदाज बाबर आझम याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मोठा डाव साधला आहे. धावांसाठी संघर्ष करत असलेला पाकिस्तानी बॅटर जवळपास वर्षभरापासून टी-२० क्रिकेटमध्ये मोठा डाव साधण्याच्या उंबरठ्यावर होता. गतवर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात तो महारेकॉर्ड आपल्या नावे करेल, असे वाटत होते. पण या दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरला अन् त्याला थेट संघाबाहेर काढण्यात आले. आता घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला पुन्हा संघात संधी मिळाली. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात ९ वी धाव घेताच बाबरनं भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
याआधी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावे होता. हिटमन रोहितनं २०२४ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर छोट्या प्रारुपातील क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आपल्या आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत १५९ सामन्यातील १५१ डावात ४,२३१ धावा केल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात छोट्याखानी खेळीसह तो रोहित शर्माला ओव्हरटेक करून आता अव्वलस्थानावर विराजमान झाला आहे. २०१६ पासून आतापर्यंत १३० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १३० डावात त्याने ४२३४ धावा काढल्या आहेत. यात ३ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
रोहितचा हा विक्रम मात्र अजूनही अबाधित
रोहित शर्माचा टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढण्यात बाबर यशस्वी ठरला असला तरी छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आजही रोहित शर्माच्या नावे आहे. रोहितनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५ शतके झळकावली आहेत. बाबर आझम हा एकमेव खेळाडू आहे जो रोहितच्या या विक्रमाच्याही जवळ आहे. पण त्याला हा विक्रम मोडण्यासाठी आणखी ३ शतके झळकावी लागती. सध्याचा बाबरचा फॉर्म आणि संघातील त्याची अस्थिरता पाहता हा विक्रम मोडणं त्याला शक्य होईल, असे वाटत नाही.