भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलने त्याच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने मंगळवारी आपल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली आणि याच बरोबर मुलाचे नावही जाहीर केले आहे. अक्षर पटेल यांच्या मुलाचे नाव हक्ष पटेल असेल. यावेळी अक्षरने एक फोटो शेअर केला आहे. यात त्याचा मुलगा हक्ष भारतीय संघाची छोटी जर्सी घातलेला दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षर पटेल आणि त्याची पत्नी मेहा यांच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. मेहाने 19 डिसेंबरला हक्षला जन्म दिला. या दोघांचे जनवरी 2023 मध्ये लग्न झाले होते.
अक्षर पटेलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले, “तो अजूनही लेग साइड आणि ऑफ साइड समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आम्ही आपल्याला ब्लूमध्ये त्याची भेट घडवण्यासाठी वाट बघू शकत नाही. भेटा हक्ष पटेलला, भारताचा सर्वात छोटा, मात्र मोठा फॅन आणि आमच्या हृदयाचा सर्वात खास भाग.” त्याच्या या पोस्टने चाहत्यांचे मन जिंकले आहे.
'हक्ष' नावाचा अर्थ -अक्षर पटेल आणि मेहा यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘हक्ष’ ठेवले आहे. विविध सोस्रेसनुसार, 'हक्ष'चा अर्थ 'डोळे', असा होतो.