Join us

अक्षर पटेलची संधी हुकली! कोण आहे तो एकमेव गोलंदाज ज्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत घेतलीये हॅटट्रिक?

अक्षर पटेलची नामी संधी हुकली, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात फक्त एकाच गोलंदाजाने साधलाय हॅटट्रिकचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:57 IST

Open in App

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा नवव्या हंगामात क्रिकेट जगतातील टॉप ८ संघ जेतेपद पटकवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. पाकिस्तान आणि दुबईत रंगलेल्या या स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेल  हॅटट्रिक हुकली. रोहित शर्मानं कॅच सोडला अन् चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी हॅटट्रिक हुकली. १९९८ पासून आतापर्यंत झालेल्या ८ हंगामात फक्त एकाच गोलंदाजाने या स्पर्धेत हॅटट्रिकचा डाव साधला आहे. इथं जाणून घेऊयात कोण आहे तो गोलंदाज अन् त्याने कोणत्या हंगामात कुणाविरुद्ध केली साधली होती हॅटट्रिकची  किमया यासंदर्भातील खास स्टोरी

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पहिल्या चार हंगामात एकाही गोलंदाजाला साधता आला नव्हता हॅटट्रिकचा डाव

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्या चार हंगामात (१९९८, २०००, २००२, २००४) एकही हॅटट्रिक पाहायला मिळाली नाही. या स्पर्धेचे यजमानपद अनुक्रमे, बांगलादेश, केनिया, श्रीलंका आणि इंग्लंड या देशांनी भूषवले होते. पहिल्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मैदान मारल्यावर न्यूझीलंड आणि श्रीलंकेपाठोपाठ वेस्ट इंडिजच्या संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. हॅटट्रिकची पाटी मात्र कोरीच राहिली.

ट्रॉफी हुकलेल्या संघातील गोलंदाजानं साधला हॅटट्रिकचा डाव

२००६ मध्ये भारताने या स्पर्धेचे यजमानपद भुषवले. या हंगामात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मुंबईच्या मैदानात फायनल रंगली होती. ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. पण त्याआधी याच हंगामातील साखळी फेरीतील लढतीत वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील जेरोम टेलर याने हॅटट्रिकचा डाव साधला होता. त्याने मायकेल हसी, ब्रॅडली हॉग आणि ब्रेटली यांची शिकार करत या पठ्ठ्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवली होती. तो वनडेत हॅटट्रिक घेणारा  वेस्ट इंडिजचा पहिला गोलंदाजही ठरला होता. ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजच्या संघानं या सामन्यात ऑस्ट्रेलियाला १० विकेट्सनी मात दिली होती. पण फायनलमध्ये त्यांना कांगारूंसमोर पराभवाचा सामना करावा लागला होता. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५अक्षर पटेलभारत विरुद्ध बांगलादेश