ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी घरच्या मैदानावर मैदानावर उतरणार आहे. काल झालेल्या सराव सामन्यात भारताकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे आव्हान समोर असताना ऑस्ट्रेलियाने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपची ( ODI World Cup 2023) तयारी सुरू केली आहे. मंगळवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वन डे संघाचा कर्णधार म्हणून जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) याची निवड केली आहे. अॅरोन फिंचने वन डे संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर डेव्हिड वॉर्नर किंवा स्टीव्ह स्मिथ यांची नावं चर्चेत होती. त्यासाठी वॉर्नरवरील कर्णधारपदाची बंदी हटवण्याच्याही हालचाली सुरू होत्या, पण आज अनपेक्षित निर्णय घेतला गेला.
कर्णधारपद जाहीर करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उप कर्णधार कोण असेल याची घोषणा केलेली नाही. कमिनन्सने ७३ वन डे सामन्यांत ११९ विकेट्स घेतल्या आहेत आणि ५-७० ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मागच्यावर्षी अॅशेस मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम पेनची हकालपट्टी केली आणि कसोटी संघाची जबाबदारी कमिन्सकडे सोपवली. त्याच्या नेतृत्वाखाली ऑसींनी पाकिस्तानविरुद्धची मालिका १-० अशी जिंकली. कमिन्सकडे वन डे संघाचे नेतृत्व हे २०२३च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत असणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑसींची संघ नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"