Join us  

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा IPL 2020 मधील सहभाग अनिश्चित, सरकारचा मोठा निर्णय

जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास २ लाख १९,०३३ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे १७० हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या ८,९५३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे ८२ हजार ९०९ लोक बरेही झाले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:12 PM

Open in App

जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास २ लाख १९,०३३ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे १७० हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या ८,९५३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे ८२ हजार ९०९ लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमावरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यात म्हणून आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा सहभागही अनिश्चित मानला जात आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) २९ मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारीत वेळेतही स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयनं जुलै-सप्टेंबरचा पर्याय शोधला आहे, परंतु त्यात परदेशी खेळाडूंचा किती सहभाग असेल यावर प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या १३व्या मोसमात खेळतील, याची शक्यताही मावळण्याच्या वाटेवर आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांना परदेशात जाऊ नका असा सल्ला दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा आयपीएलमधील सहभाग प्रश्नात्मक झाला आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांवर लेव्हर फोर वॉर्निंग देण्यात आली आहे. त्यांना परदेशात प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, परंतु त्याचा अर्थ त्यांच्यावर परदेश दौऱ्याची बंदी असा नाही. ऑस्ट्रेलियन सरकारने सांगितले की,''जर कोणाला प्रवास करायचाच असेल, तर त्यांनी  सुरक्षेच्या दृष्टीनं सल्ला घ्यावा. कदाचित तुमच्या प्रवास विमा पॉलिसीत कोरोना व्हायरसचा समावेश नसावा. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन सरकार काहीच मदत करू शकत नाही.''

ऑस्ट्रेलियन सरकारने काढलेला हा फतवा पुढील महिनाभर कायम राहिल्यास ऑसी खेळाडू आयपीएलसाठी भारतात येऊ शकत नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूत नव्यान दाखल झालेला अॅरोन फिंच म्हणाला,''असं भयानक आम्ही काही पाहीलं नव्हतं. सरकारने दिलेला सल्ला दोन किंवा तीन आठवड्यात बदलू शकतो. त्यामुळे आत्ताच काही प्लान करणं शक्य नाही. पण, मी सर्वांना सांगू इच्छितो की स्वतःला सुरक्षित ठेवा.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 रद्द झाल्यास MS Dhoniसह तीन खेळाडूंना मोठा फटका!

टीम इंडियाच्या ओपनरला ओळखलंत का? ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना मोडलेला ७१वर्षांपूर्वीचा विक्रम

... तर Virat Kohli, MS Dhoni यांच्यासह अनेकांना कोट्यवधींचा भुर्दंड

 

टॅग्स :आयपीएल 2020आॅस्ट्रेलियाकोरोना वायरस बातम्याअ‍ॅरॉन फिंच