Join us

David Warner Pathan: ऑस्ट्रेलियन स्टार डेव्हिड वॉर्नर 'पठाण'च्या प्रेमात; रील शेअर करून चाहत्यांना विचारला प्रश्न

pathan box office collection: ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 09:56 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो नेहमी व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. आता त्याने एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शाहरुख खानच्या पठाण या नवीन चित्रपटाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोणही दिसत आहे. यासोबत त्याने लिहिले आहे, "काय चित्रपट आहे, तुम्ही याचे नाव सांगू शकाल का."

चाहत्यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रियाया व्हिडीओमध्ये डेव्हिड वॉर्नर हुबेहुब शाहरुख खानसारखा दिसत आहे, तर दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांनी वॉर्नरच्या या व्हिडीओवर काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या या व्हिडीओवर बॉस ऑफ बाली नावाच्या युजरने 'ऑस्कर नॉमिनेशन इनकमिंग' अशी कमेंट केली. तर वैभव चिलुका नावाच्या इंस्टाग्राम युजरने 'डेव्हिड खान' असे लिहिले आहे. 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी असणार मैदानातखरं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये डेव्हिड वॉर्नर खेळताना दिसणार आहे. तर सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये डेव्हिड वॉर्नरचा संघ सिडनी थंडर 27 जानेवारीला ब्रिस्बेन हीटकडून पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन. 

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

  1. 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
  2. 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
  3. 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
  4. 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

 

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका

  1. 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई 
  2. 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
  3. 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरशाहरुख खानपठाण सिनेमादीपिका पादुकोणसेलिब्रिटी
Open in App