क्रिकेटर डेविड वॉर्नरने बनवला पूर्ण 'पुष्पा' सिनेमा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

David Warner Acting on Pushpa : यावेळी त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत पुष्पातील सिनेमातील गाण्यावर नाही तर यावेळी त्याने अॅक्शन सीनमध्ये हात आजमावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 14:27 IST2022-01-26T14:25:14+5:302022-01-26T14:27:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Australian cricketer David Warner created entire Pushpa film scene see the video | क्रिकेटर डेविड वॉर्नरने बनवला पूर्ण 'पुष्पा' सिनेमा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

क्रिकेटर डेविड वॉर्नरने बनवला पूर्ण 'पुष्पा' सिनेमा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

David Warner Acting on Pushpa: 'पुष्पा' सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये या सिनेमाची क्रेझ बघायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टिमचा फलंदाज डेविड वॉर्नरही पुष्पा सिनेमाने जादू केली आहे. वॉर्नरने काही दिवसांपूर्वी पुष्पातील श्रीवल्ली गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला होता. आता त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

यावेळी त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत पुष्पातील सिनेमातील गाण्यावर नाही तर यावेळी त्याने अॅक्शन सीनमध्ये हात आजमावला आहे. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, वॉर्नरने सिनेमातील काही जबरदस्त सीनची निवड केली आहे. त्याने सर्वच सीनमध्ये अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर आपला चेहरा मर्ज केला आहे. हे काम इतकं बारकाईने केलं की, ते मर्ज केल्यासारखं दिसतच नाहीये.

तुम्हाला व्हिडीओ बघून वाटेल की, सिनेमाचा खरा हिरो वॉर्नरच आहे. डेविड वॉर्नरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर फारच पसंत केला जात आहे. व्हिडीओ पोस्ट करून डेविड वॉर्नरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'अॅक्टिंगला अल्लू अर्जुनने फारच सोपं बनवलं आहे'. या व्हिडीओला ३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

डेविड वॉर्नरने याआधी 'पुष्पा' सिनेमातील 'श्रीवल्ली' या गाण्यावर अल्लू अर्जुन स्टाइलने डान्स केला होता. या व्हिडीओलाही सोशल मीडियावर खूप पसंत केलं गेलं. त्याने सिनेमाच्य ट्रेलर लॉन्चवेळीही एक व्हिडीओ शेअर केला होता.
 

Web Title: Australian cricketer David Warner created entire Pushpa film scene see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.