Join us

IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

सात वेळच्या चॅम्पियनसमोर दोघींनी अगदी तोऱ्यात फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे खांदे पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 21:35 IST

Open in App

IND W vs AUS W 2nd Semi Final, Harmanpreet Kaur and Jemimah Rodrigues Highest partnerships for India : ऑस्ट्रेलियन संघाने ठेवलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरली. टीम इंडियाच्या धावफलकावर १३ धावा असताना शफालीच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. त्यानंतर ५९ धावांवर स्मृती मानधाच्या रुपात भारतीय संघाला मोठा धक्का बसला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जेमिमा रॉड्रिग्ज- हरमनप्रीत कौरची दमदार भागीदारी 

सलामीच्या बॅटर स्वस्तात माघारी फिरल्यावर  तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर जोडी जमली. दोघींनी मिळून वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉकआउट्समधील लढतीत भारतीय संघाकडून सर्वोच्च भागीदारीचा नवा रेकॉर्ड सेट करत भारतीय संघाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारण्याची आशा पल्लवित केल्या. सात वेळच्या चॅम्पियनसमोर दोघींनी अगदी तोऱ्यात फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे खांदे पाडले.

Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध  ८ वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीत आणखी भर घालत सेट केला नवा विक्रम 

याआधी २०१७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाकडून हरमनप्रीत कौरनं दीप्ती शर्माच्या साथीनं १३७ धावांची भागीदारी केली होती. हा रेकॉर्ड मागे टाकत हरमनप्रीतनं यावळी जेमिमा रॉ़ड्रिग्जच्या साथीनं सर्वोच्च भागीदारीचा विक्रम सेट केला. नवी मुंबईतील मैदानात रंगलेल्या सामन्यात ३३८ धावांचा पाठलाग करताना दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी रचली. हरमनप्रीत कौरच्या दमदार खेळीला ८९ धावांवर ब्रेक लावत ॲनाबेल सदरलँड हिने ही जोडी फोडली.  हरमनप्रीत कौरचं शतक अवघ्या ११ धावांनी हुकलं. पण विकेट गमावण्याआधी तिने आपली जबाबदारी चोख बजावत संघाला सामन्यात कायम ठेवलं आहे.  

भारतीय महिलांच्या संघाच्या वर्ल्ड कप नॉकआउट्स लढतीत  कोणत्याही विकेटसाठी भारताकडून सर्वाधिक भागीदारीचा रेकॉर्ड 

  • १३९* – हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, मुंबई डी. वाय. पाटील स्टेडियम, २०२५ उपांत्य सामना
  •  १३७ – हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, डर्बी, २०१७ उपांत्य सामना
  •  ९५ – हरमनप्रीत कौर, पूनम राऊत विरुद्ध इंग्लंड महिला, लॉर्ड्स, २०१७ अंतिम सामना
  •  ६६ – हरमनप्रीत कौर, मिताली राज विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, डर्बी, २०१७ उपांत्य सामना
  •  ६६ – मिताली राज, अंजुम चोप्रा विरुद्ध न्यूझीलंड महिला, पॉटचेस्ट्रूम, २००५ उपांत्य सामना  
English
हिंदी सारांश
Web Title : Harmanpreet-Jemimah's Record Partnership Lights Up India's World Cup Hopes Against Australia

Web Summary : Harmanpreet Kaur and Jemimah Rodrigues forged a record-breaking partnership in the World Cup semi-final against Australia, raising India's hopes after an early batting collapse. Their aggressive batting put pressure on the Australian bowlers, setting a new record for India in World Cup knockouts.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहरनमप्रीत कौरजेमिमा रॉड्रिग्ज