Australia vs West Indies, 1st Test : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना तिसऱ्या दिवशीच निकाली लागण्याचे संकेत दिसत आहेत.बार्बाडोसमधील ब्रिजटाउनच्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्या दोन दिवसांच्या खेळात फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. एक अर्धशतक सोडले तर अन्य कोणत्याही फलंदाला मैदानात तग धरता आला नाही. दोन दिवसांत २४ विकेट्स पडल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फक्त एक अर्धशतक...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या हंगामात दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा फायनल सामना गमावल्यावर वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेसह ऑस्ट्रेलिया संघाने आगामी WTC चक्राची सुरुवात केली आहे. बार्बाडोसमधील ब्रिजटाउनच्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना यजमान वेस्ट इंडिजच्या संघाने पाहुण्या कांगारुंना अवघ्या १८० धावांत आटोपले. टॅविस हेडच्या ५९ धावा वगळता दोन्ही संघातील अन्य एकाही खेळाडूला अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही.
ENG vs IND : पहिल्या T20I सामन्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?
कॅरेबियन संघाने घेतली अल्प आघाडी
ऑस्ट्रेलियन संघाला १८० धावांवर रोखल्यावर वेस्ट इंडिजच्या संघाने कर्णधार रोस्टन चेज ४४ (१०८) आणि विकेट किपर बॅटर शाइ होप ४८ (८१) यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर पहिल्या डावात १९० धावा करत कॅरेबियन संघाने १० धावांची का होऊन पण आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ९२ धावांवर ४ विकेट्स गमावल्या. यासह दोन दिवसांच्या खेळात यजमान वेस्ट इंडिजच्या १० आणि पाहुण्या संघाने गमावलेल्या १४ अशा या सामन्यात एकूण २४ विकेट्स पडल्या आहेत. हा सामना निकाली लागणार हे जवळपास स्पष्ट झालं असून कोण कुणाचा खेळ खल्लास करणार ते पाहण्याजोगे असेल.
कोणत्या गोलंदाजांनं किती विकेट्स घेतल्या. उचलला याचा फायदा
ऑस्ट्रेलियन संघाकडून पहि्या डावात मेचेल स्टार्कनं सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय हेजलवूड, पॅट कमिन्स आणि वेबस्टर यांनाा प्रत्येकी २-२ आणि लायनला एक विकेट मिळाली. कॅरिबियन संघाकडून जेडन सील्स याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. शामर जोसेफनं आपल्या खात्यात ४ विकेट्स जमा केल्या तर जस्टिन ग्रेव्सला एक विकेट मिळाली. दुसऱ्या डावातही या गोलंदाजांनी प्रत्येकी १- १ विकेट जमा केली असून अल्झारी जोसेफनंही आपल्या खात्यात एक विकेट जमा केली आहे.