AUS vs IND, KL Rahul Scores Fifty : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या टॉप आर्डरमधील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि विराट कोहली अगदी स्वस्तात तंबूत परतल्यावर संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी पुन्हा एकदा लोकेश राहुलवर येऊन पडली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ओपनिंगची संधी मिळाल्यानंतर या बॅटरनं आपल्या भात्यातील क्लास दाखवून दिला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातही त्यांनी संयमी खेळी केली.
स्मिथनं सोडला कॅच, मग लोकेश राहुलनं ठोकली दुसरी फिफ्टी
गाबा कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी केएल राहुल आणि रोहित शर्मानं ४ बाद ५१ धावांवरून खेळ पुढे नेण्यास सुरुवात केली. या दिवसाच्या खेळातील पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथनं लोकेश राहुलचा झेल सोडला. ज्यावेळी झेल सुटला त्यावेळी लोकेश राहुल ३३ धावांवर बॅटिंग करत होता. जीवनदान मिळाल्यावर KL राहुलनं बॉर्डर गावसकर स्पर्धेतील दुसरे अर्धशतक शतक झळकावलं.
सतरावे अर्धशतक
स्मिथनं सोडलेला कॅच टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा होता. केएल राहुलनं कसोटी कारकिर्दीतील आपलं सतरावे शतक साजरे केले. सेना देशांत त्याने पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवून दिली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत लोकेश राहुल सोडला तर अन्य कुणालाही आत्मविश्वासानं खेळ दाखवता आलेला नाही. ब्रिस्बेनच्या मैदानातील अर्धशतकी खेळी केएल राहुल शतकामध्ये रुपांतरित करेल, असे वाटत असताना लायननं त्याचा खेळ खल्लास केला. विशेष म्हणजे ज्यानं आधी सोपा कॅच सोडला त्या स्मिथनं स्लिपमध्ये जबरदस्त कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले.
आश्वाशक खेळीला लागला ब्रेक, लायननं टीम इंडियाला दिला सहावा धक्का
चौथ्या दिवसाच्या खेळातील पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर कॅच सोडल्यावर लोकेश राहुलनं अगदी खास अंदाजात अर्धशतक पूर्ण केले. तो शतकी खेळीसह टीम इंडियाला अडचणीतून सहज बाहेर, असे वाटत होते. पण ८४ धावांवर त्याच्या क्लास खेळीला ब्रेक लागला. ज्या स्मिथनं याआधी त्याचा सोपा झेल सोडला त्यानेच एका सुपर कॅचसह केएल राहुलच्या खेळीला ब्रेक लावला. टीम इंडियासाठी हा खूप मोठा झटका ठरला.
Web Title: Australia vs India Gabba Test KL Rahul scores gritty fifty after Steve Smith gives Day 4 lifeline
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.