बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO)

मुंबईकर रोहित-अय्यरची शतकी भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:06 IST2025-10-23T13:01:18+5:302025-10-23T13:06:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Australia vs India Australia, 2nd ODI Stump Mic Conversation Between Rohit Sharma And Shreyas Iyer Video Goes Viral | बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO)

बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO)

IND vs AUS 2nd ODI Stump Mic Conversation Between Rohit Sharma And Shreyas Iyer : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ॲडलेड वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरनं दमदार भागीदारीसह टीम इंडियाचा डाव सावरला. नवा कर्णधार शुबमन गिल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरल्यावर मैदानात उतरलेल्या कोहलीनं पुन्हा एकदा चार चेंडूचा सामना करून शून्यावर माघारी धाडले. भारताच्या डावातील सातव्या षटकात झेवियर बार्टलेट याने १७ धावांवर भारतीय संघाला गिल आणि विराट कोहलीच्या रुपात दोन धक्के दिले. भारतीय संघाने १७ धावांवर  संघ अडचणीत असताना उप कर्णधार श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा जोडी जमली. दोघांनी आश्वासक खेळीसह शतकी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बॅटिंगवेळी रोहित शर्माची अय्यरसमोर 'बोलंदाजी'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बॅटिंग वेळी रोहित शर्मानं मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरसमोर केलेली बोलंदाजीही लक्षवेधी ठरली. भारताच्या डावातील १४ व्या षटकात जोश  हेजलवूड गोलंदाजी करत होता. तो सलग सातवे षटक टाकत असताना रोहित शर्मानं एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण नॉन स्ट्राइकला असलेल्या श्रेयस अय्यरनं धाव घेण्यास नकार दिला. यावर रोहित शर्मानं जोश हेजलवूड सातवी ओव्हर टाकतोय यार, असं म्हणत गोलंदाज थकला असल्यामुळे ही धाव चोरण्याची संधी होती, अशी भावना व्यक्त केली. रोहितचा अय्यरसोबतचा हा संवाद स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबईकर रोहित-अय्यरची शतकी भागीदारी

रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या जोडीनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ॲडलेड येथील ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी १३८ चेंडूत ११८ धावांची भागीदारी रचली. रोहित शर्मानं ९७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने भारताकडून सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनं ७ चौकाराच्या मदतीने ७७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या मैदानात अय्यरचं हे पहिलं अर्धशतक ठरले.

Web Title : रोहित की अय्यर को 'बॉलिंग': मैदान पर क्या हुआ?

Web Summary : रोहित शर्मा और श्रेयस अय्यर ने ऑस्ट्रेलिया के खिलाफ भारत की पारी को संभाला। रोहित ने गेंदबाज की थकान पर चुटकी लेते हुए रन चुराने की बात कही। दोनों की शतकीय साझेदारी महत्वपूर्ण रही।

Web Title : Rohit's 'Bowling' to Iyer: What happened on the field?

Web Summary : Rohit Sharma and Shreyas Iyer stabilized India's innings against Australia after an early collapse. Rohit joked about stealing a run, noting the bowler's fatigue. The duo's century partnership proved crucial in the Adelaide ODI.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.