AUS vs IND, Sam Konstas Extraordinary Shots Against Jasprit Bumrah Hit Six : मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सॅम कोन्स्टास (Sam Konstas) याने १९ वर्षे ८५ दिवस वयात कसोटी पदार्पण करत ऑस्ट्रेलियाकडून कमी वयात पदार्पण करणाऱ्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली. एवढेच नाही तर या युवा फलंदाजाने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात एकदम कडक अंदाजात सुरुवातही केल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेट जगतातील भल्या भल्या फलंदाजांना बुमराहच्या गोलंदाजीवर खेळताना अंगात कापरे भरत. पण भारताच्या या प्रमुख गोलंदाजाच्या विरुद्ध सॅम कोन्स्टासनं याने तोऱ्यात अन् एकदम बिनधास्त अंदाजात बॅटिंग करत लक्षवेधून घेतलं.
युवा पोराचा बुमराहच्या गोलंदाजीवर आक्रमक अंदाज
सॅम कोन्स्टास याने बुमराहच्या गोलंदाजीवर स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न करून आपल्यातील बिनधास्त अंदाजाचं दर्शन दाखवलं. त्याचा पहिला प्रयत्न फसला. पण तो मागे हटला नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ७ व्या षटकात त्याने टी-२० स्टाईलमध्ये स्कूप शॉटवर षटकार मारत बुमराहसह सर्वांना स्तब्ध केले. पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहच्या पहिल्या स्पेलमध्ये त्याने दोन षटकार मारले. बुमराहच्या गोलंदाजीवर कसोटीत षटकार मारणं सोपी गोष्ट नाही. पण या युवा बॅटरनं बुमराहच्या गोलंदाजीवर आक्रमक अंदाजात बॅटिंग केली.
४ हजार ४८४ चेंडूनंतर बुमराहनं खाल्ला षटकार
मागील ४ हजार ४८४ चेंडूत बुमराहनं कसोटीत कोणत्याही बॅटरला सिक्सर मारू दिला नव्हता. पण १९ वर्षाच्या पोरानं बुमराहला षटकार मारून दाखवत आपल्यातील आक्रमक अंदाजाचा परिचय करुन दिला. कसोटी इतिहासात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ६ मोजक्या खेळाडूंनीच षटकार मारला आहे. त्यात आता युवा बॅटर सॅम कोन्स्टास याच्या नावाचा समावेश झाला आहे. कसोटीत बुमराहच्या गोलंदाजीवर सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा जोस बटरलच्या नावे आहे. सॅम कोन्स्टास याने बुमराहच्या पहिल्या स्पेलमध्येच दोन षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.
कसोटीत बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार मारणारे फलंदाज
सॅम कोन्स्टास (ऑस्ट्रेलिया) २ षटकार*जोस बटलर (इंग्लंड) २ षटकारमोईन अली (इंग्लंड) १ षटकारएबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) १ षटकारकॅमरुन ग्रीन (ऑस्ट्रेलिया) १ षटकारनॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) १ षटकारआदिल राशिद (इंग्लंड) १ षटकार