नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा जोडीनं मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटीत अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला मोठा आधार दिला. दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियानं रिषभ पंत २८ (३७) आणि रवींद्र जडेजा १७ (५१) यांना तंबूत धाडत पहिले सत्र गाजवले. त्यानंतर ही जोडी जमली अन् दोघांनी ऑस्ट्रेलियन मैदानात आठव्या विकेटसाठी भारताकडून ऑस्ट्रेलियन मैदानात आठव्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी नोंदवली. वॉशिंग्टन सुंदर १६२ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ५० धावा करून बाद झाला अन् सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग याचा सर्वोच्च विक्रम अवघ्या २ धावांनी अबाधित राहिला.
नितीश कुमार रेड्डी अन् वॉशिंग्टन सुंदरन सावरला डाव. दोघांनी १५० पेक्षा अधिक चेंडूंचा केला सामना
टीम इंडियावर बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट निर्माण झालं होते. जड्डूच्या रुपात २२१ धावांवर टीम इंडियाने सातवी विकेट गमावल्यावर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दुसऱ्या बाजूला नितीश कुमार मैदानात तग धरून उभा होता. ही जोडी जमली आणि दुसऱ्या सत्रात या दोघांनी दमदार शतकी भागीदारीसह टीम इंडियाचा डाव सावरला. कसोटी क्रिकेटमध्ये आठव्या-नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या बॅटरनी १५० पेक्षा अधिक चेंडूचा सामना करण्याचा पराक्रम ही या जोडीच्या नावे झाला. याआधी कसोटीत तळाच्या फलंदाजीत अन्य कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केल्याचे पाहायला मिळालेले नाही.
ऑस्ट्रेलियातील मैदानात आठव्या विकेटसाठी भारतीय सघाक़ून सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड
सचिन तेंडुलकर-हरभजन सिंग, १२९ धावा (२००८)नितीश कुमार रेड्डी-वॉशिंग्टन सुंदर १२७ धावा (२०२४)हरभजन सिंग-अनिल कुंबळे, १०७ धावा (२००८)सुनील गावसकर-रॉजर बिन्नी, ७६ धावा (१९८५)