Join us

AUS vs IND : मियाँ मॅजिक! सिराजनं सेट झालेल्या लाबुशेनला टेकायला लावले गुडघे

ण सिराजनं जबरदस्त कमबॅक करत मेलबर्नच्या कसोटीत मियाँ मॅजिक दाखवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 11:01 IST

Open in App

AUS vs IND, 4th Test Day 4 Mohammed Siraj Gets Big Wicket Of Marnus Labuschagne मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीतील धार पाहायला मिळाली. सातत्याने टीम इंडियासाठी नव्या चेंडूवर गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजला यावेळी जुन्या चेंडूवर गोलंदाजी करण्याची वेळ आली. आकाशदीप त्याची जागा घेतोय, असा सीन क्रिएट झाला. पण सिराजनं जबरदस्त कमबॅक करत मेलबर्नच्या कसोटीत मियाँ मॅजिक दाखवून दिले.

सिराजचा भेदक मारा, लाबुशेनला टेकायला लावले गुडघे

सेट झालेल्या लाबुशेनं याची महत्त्वपूर्ण विकेट घेत त्याने टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. १३९ चेंडूचा सामना करणाऱ्या लाबुशेन याने ७० धावांची खेळी करत पॅट कमिन्ससोबत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. एका अप्रतिम चेंडूवर त्याला पायचित करत सिराजनं टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या लाबुशेनचा अडथळा दूर केला. सिराजनं या विकेटसह टीम इंडियाला टेन्शन फ्री करत कांगारूंची धाकधूक वाढवली आहे. १४८ धावांवर लाबुशेनच्या रुपात ऑस्ट्रेलियाला ७ वा धक्का बसला. कॅप्टन पॅट कमिन्सच्या साथीनं त्याने सातव्या विकेटसाठी ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

लाबुशेन अन् सिराज यांच्यातील बेल्स अदला बदलीचा खेळही गाजला, पण यावेळी सिराज खरा डाव खेळला

लाबुशेन याचे लक्षविचलित करण्यासाठी मोहम्मद सिराजनं त्याच्यासमोर बेल्स अदला-बदलीचा खेळ खेळल्याचेही पाहायला मिळाले. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात तर सिराजच्या खेळात लाबुशेनही सहभागी झाला होता. बेल्स बदलून सिराज बॉलिंग मार्कवर परतल्यावर लाबुशेन याने सिराजनं अदला-बदल केलेल्या बेल्स पुन्हा जशा पूर्वी होत्या तशा ठेवल्याचे पाहायला मिळाले. या मियाँ मॅजिकची चर्चा झाली कारण त्यानंतर लाबुशेन याने विकेट गमावली होती. विकेट सिराजला मिळाली नसली तरी  लाबुशेनसोबतचा हा सीन चांगलाच गाजला. मेलबर्न कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सिराज विकेटलेस राहिला. यावेळीही अर्धशतकी खेळी करणाऱ्या लाबुशेन याच्यासोबत सिराजनं बेल्स अदला-बदलीचा खेळ खेळला होता. पण त्याने सिराजच्या या कृत्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या डावात हा खेळ बाजूला ठेवून सिराजने त्याला आउट करण्याचा परफेक्ट डावच साधला.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमोहम्मद सिराजआॅस्ट्रेलिया