Join us

DSP सिराज ऑन 'ड्युटी'! उस्मान ख्वाजाची विकेट घेत दाखवली गोलंदाजीतील 'ब्युटी'

पहिल्या डावात सिराजला एकही विकाट नाही मिळाली, पण यावेळी त्याने जोर लावला अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 07:15 IST

Open in App

AUS vs IND,  Mohammed Siraj Finally Gets His First Wicket Cleans up Usman Khawaja :   मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघानं दमदार कमबॅक केले आहे. नितिशकुमार रेड्डीच्या शतकी खेळीत हातभार लावल्यानंतर मोहम्मद सिराजचा आत्मविश्वास वाढल्याचा सीन पाहायला मिळाला. पहिल्या डावात एकही विकेट न मिळालेल्या DSP सिराजनं ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाची विकेट घेत 'ऑन ड्युटी' असल्याचे दाखवून देत गोलंदाजीतील 'ब्युटी' दाखवून दिली. एका बाजूला जसप्रीत बुमराह जोर लावत असताना मोहम्मद सिराज कमी पडताना पाहायला मिळाले. त्यामुळे भारतीय गोलंदाजीची ताकदही कमी पडतीये, असे चित्र निर्माण झाले होते.  पण फायनली ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सिराजनं कमालीची गोलंदाजी करताना भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. उस्मान ख्वाजाचा त्रिफळा उडवल्यावर  सिराजनं किंग कोहलीच्या साथीनं केलेले सेलिब्रेशनही पाहण्याजोगे होते.   

सिराजनं ऑस्ट्रेलियाला दिला दुसरा धक्का

पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या उस्मान ख्वाजानं दुसऱ्या डावात ६५ चेंडूचा सामना करत २ चौकाराच्या मदतीने २१ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं त्याच्या रुपात टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. या विकेटसह ऑस्ट्रेलियन संघानं ४३ धावांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. पहिल्या डावात या दोघांनी अर्धशतकी खेळीसह पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचली होती.  दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर सलामी जोडी फोल ठरली. दुसऱ्या डावातील २५ षटकात ऑस्ट्रेलियानं २ विकेट्सच्या मोबदल्यात ५३ धावा करत सामन्यात १५८ धावांची आघाडी घेतली असली तरी टीम इंडियानं ही मॅचमध्ये दमदार कमबॅक केले आहे. ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के द्यायचे असतील तर बुमराहला सिराजची साथ मिळणं खूप महत्त्वाचं होते. त्याने दुसऱ्या डावात सुरुवात चांगली केली असून तो सातत्य कायम राखून मोठा डाव साधण्यासाठी प्रयत्नशील असेल.

सिराज बॉलिंगशिवाय या गोष्टींमुळे राहिला चर्चेत

मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सिराजला एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण या डावात मार्नस लाबुशेनसमोर त्यानं खेळलेला बेल्स अदला-बदलीचा खेळही लक्षवेधी ठरला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात नितीशकुमारच्या शतकी खेळीत मोहम्मद सिराजनं मोलाचा वाटा उचलला. नितीशकुमार ९९ धावांवर नॉन स्ट्राइकवर असताना जसप्रीत बुमराहच्या रुपात टीम इंडियाला पॅट कमिन्सनं ९ वा धक्का दिला. त्यानंतर  सिराज मैदानात उतरला. तो पॅट कमिन्सची ओव्हर खेळून काढणार का? विकेट तर नाही ना फेकणार? असे प्रश्न नितीशकुमार रेड्डीच्या शतकी खेळीआधी उपस्थितीत झाले होते. पण सिराज आत्मविश्वासानं खेळला अन् युवा नितीशकुमार रेड्डीच्या शतकासाठी मोठा हातभार लावला. याच रिप्लेक्शन आता त्याच्या गोलंदाजीतही पाहायला मिळाले. सुरुवातीला मिळवलेल्या विकेटनंतर त्याच्या गोलंदाजीतील स्पीडही वाढल्याचे पाहायला मिळाले. त्याने टाकलेला १४० kph गतीचा चेंडू तो आणखी प्रभावी मारा करण्यास सज्ज असल्याचे संकेत देणारा होता.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमोहम्मद सिराजजसप्रित बुमराहआॅस्ट्रेलिया