Join us

Nitish Kumar Reddey ची पहिली फिफ्टी! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' स्टाईलमध्ये केलं सेलिब्रेशन (VIDEO)

२१ वर्षीय युवा खेळाडूनं बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं वहिलं अर्धशतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 08:42 IST

Open in App

AUS vs IND, 4th Test,  Allu Arjun Pushpa Celebration By Nitish Kumar Reddey After Maiden Fifty  : मेलबर्न बॉक्सिंग कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया अडचणीत असताना नितीश कुमार रेड्डी पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सुरुवातीपासूनच्या कसोटी सामन्यात आघाडीची फलंदाजी कोलमडल्यावर नितीश कुमार रेड्डीनं मैदानात तग धरून बॅटिंग करत आपल्यातील क्षमता दाखवून दिली. अल्प खेळीसह संघाचा डाव सावरणाऱ्या या २१ वर्षीय युवा खेळाडूनं बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं वहिलं अर्धशतक झळकावले. या अविस्मरणीय खेळीच सेलिब्रेशनही त्याने अगदी खास अंदाजात केले. अल्लू अर्जूनच्या पुष्पा स्टाइलमध्ये त्याने "फ्लावर नहीं फायर है मैं..." म्हणत अर्धशतकी खेळीचा आनंद व्यक्त केला.

एक डाव सोडला, तर प्रत्येक डावात गाठला ४० प्लसचा आकडा, अखेर चौथ्या सामन्यात आली पहिली फिफ्टी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळालेल्या संधीचं २१ वर्षीय ऑल राउंडर खेळाडूनं सोनं करून दाखवलं आहे. बॉलिंगमध्ये तो फारशी छाप सोडताना दिसला नाही. पण फलंदाजीतील त्याचा तोरा लाजवाब असाच राहिला. पर्थ कसोटीच्या पहिल्या सामन्यात भारतीय  संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर पहिल्या डावात नितीश कुमार रेड्डीच्या भात्यातू ४१ धावांची उपयुक्त खेळी आली होती. या सामन्यातील दुसऱ्या डावातही त्याने ३८ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात त्याने ४० धावासंख्येचा आकडा पार केला. पण फिफ्टीपर्यंत तो पोहचला नव्हता. दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात त्याने ४२-४२ धावा केल्या होत्या. तिसऱ्या डावात पुन्हा त्याने ४० प्लस धावांची खेळी केली. ब्रिस्बेन कसोटीतील दुसऱ्या डावातील १६ धावा वगळता प्रत्येक डावात त्याने ४० प्लस धावा केल्या. बॉक्सिंग डे कसोटीत अखेरच त्याच्या भात्यातून कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक आले.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया