Australia vs India, 3rd Test Day 5 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीतील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांत आटोपला आहे. बॅटिंगमध्ये जलवा दाखवणाऱ्या टॅविस हेडनं आकाशदीपला कॅरी करवी स्टंपिंग करत आपल्या खात्यात एक विकेट जमा करत टीम इंडियाला शेवटचा धक्का दिला.
बुमराह-आकाशदीप यांच्यात ७९ चेंडूत ४७ धावांची उपयुक्त भागीदारी
आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह या जोडीनं दहाव्या विकेटसाठी ७९ चेंडूत ४७ धावांची उपयुक्त भागीदारी केली. ऑस्ट्रेलिया संघानं या सामन्यात १८५ धावांची आघाडी घेतली आहे. आकाशदीपनं ४४ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ चेंडूत ३१ धावांची उपयुक्त खेळी केली. जसप्रीत बुमराहनं ३८ चेंडूचा सामना करताना एका षटकाराच्या मदतीने १० धावांची खेळी केली.
आता पाऊन बॅटिंग करण्याच्या तयारीत
भारतीय संघाचा पहिला डाव आटोपल्यावर ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्यांदा बॅटिंगला उतरण्याआधी पाऊस पॅड बांधून तयार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ब्रिस्बेननमधील ढगाळ वातावरणामुळे पावसाचे संकेत मिळत असून ऑस्ट्रेलियन संघापेक्षा पाऊसच अधिक बॅटिंग करेल, अशी शक्यता दिसते. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अखेरच्या दिवशी ६० ते ७० टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत होते, पण अखेरच्या सत्रात भारतीय ंसंघाला मिळाला दिलासा
ऑस्ट्रेलियन संघानं पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. भारतीय संघ पुन्हा एकदा बॅटिंगमध्ये कमी पडला. लोकेश राहुल ८४ (१३९) आणि रवींद्र जडेजानं ७७ (१२३) यांनी अर्धशतकी खेळी केल्यावर आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह यांनी भारताकडून शेवटच्या विकेटसाठी चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी करत संघाला फॉलोऑनच्या संकटातून बाहेर काढले. फॉलोऑनची नामुष्की टळल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला अखेरच्या दिवशी बाजी मारण्याची संधी होती ती हुकली.
भारताकडून दहाव्या विकेटसाठीचा सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड
- सुनील गावसकर-शिवलाल यादव (१९३५) ९४ धावा
- अनिल कुंबळे-इशांत शर्मा (२००८) ५८ धावा
- अजित आगरकर-झहीर खान (२००४) ५२ धावा
- आकाशदीप-जसप्रीत बुमराह (२०२४) ४७ धावा