AUS vs IND, Pat Cummins Strikes Early Rohit Sharma Dismissed : ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशीही टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या अर्ध्या तासातच भारतीय संघानं रोहित शर्माच्या रुपात चौथ्या दिवसाच्या खेळातील पहिली विकेट गमावली. ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिमन्स याने परफेक्ट सेटअपसह धावांसाठी संघर्ष करणाऱ्या रोहित शर्माला चकवा दिला.
मोह अनावर झाला अन् पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहित शर्मा फसला
बाहेर जाणाऱ्या चेंडूला जा बाबा.. म्हणणाऱ्या रोहितसमोर बॅकअप लेंथ चेंडूंचा मारा करत पॅट कमिन्स एक चेंडू टप्पा बदलून थोडा पुढ टाकला. भारताच्या डावातील २४ व्या षटकात पॅटनं टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्मानं फ्रंटफूटवर न जाता जागेवरून बाहेर जाणाऱ्या चेंडूवर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला अन् तो फसला. हिटमॅन रोहित शर्मानं बाहेर जाणाऱ्या चेंडूवर रिस्क न घेता टेन्शन फ्री खेळण्याच मन बनवलं आहे, असे वाटत होते. पण पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्याच मन बदलल. बाहेर जाणारा चेंडू जागेवरून खेळण्याचा मोह त्याला चांगलाच महागात पडला. विकेटमागे कॅरीनं कोणतीही चूक न करत कॅच पकडला. ४ बाद ५१ धावांवरून चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियानं ७४ धावांवर पाचवी विकेट गमावली. रोहित शर्मानं २७ चेंडूचा सामना करून २ चौकाराच्या मदतीने १० धावा केल्या.
हिटमॅन रोहितच्या फ्लॉप शोचा सिलसिला
रोहित शर्मा सातत्याने धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर डावाची सुरुवात करण्यापेक्षआ सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावरही त्याला सावता आलेले नाही. मागील १३ डावात रोहित शर्माच्या भात्यातून फक्त एक अर्धशतक पाहायला मिळाले. ८ वेळा तो दुहेरी आकडा गाठण्याच्या आधीच तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले आहे. १३ डावात ११.६९ च्या सरासरीनं त्याने फक्त १५२ धावा केल्या आहेत.
मागील १३ डावात फक्त एक अर्धशतक
बांगलादेश विरुद्धच्या घरच्या मैदानात रंगलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चेन्नई कसोटी सामन्यात रोहितला दोन्ही डावात दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आले होते. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ५ धावा करून तो बाद झाला होता. बांगलादेश विरुद्ध कानपूर कसोटीत रोहितनं अनुक्रमे २३ आणि ८ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील बंगळुरुच्या मैदानात त्याने पहिल्या डावात २ धावांवर आउट झाल्यावर दुसऱ्या डावात ५२ धावांची खेळी केली. पण त्यानंतर पुन्हा तो सातत्याने अपयश आले. न्यूझीलंड विरुद्धच्या पुणे कसोटीतील पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नव्हते. दुसऱ्या डावात तो ८ धावा करून तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. मुंबई कसोटीत तो १८ आणि ११ धावा पर्यंतच मजल मारू शकला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ कसोटीला मुकल्यानंतर अॅडिलेड कसोटी सामन्यातून रोहिनं कमबॅक केले. या सामन्या तो पहिल्या डावात ३ धावा तर दुसऱ्या डावात ६ धावा करून बाद झाला. आता ब्रिस्बेन कसोटीत त्याने दुहेरी आकडा गाठला पण पुन्हा तो स्वस्तात माघारी फिरला.