Join us

AUS vs IND : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; टीम इंडियासाठी Follow On संकट टाळणं झालं सोपं; कारण...

टीम इंडियाच्या फलंदाजांना टेन्शन फ्री खेळण्याची एक संधी निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 08:47 IST

Open in App

Australia vs India, 3rd Test Josh Hazlewood Injured  : बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर रंगला आहे. ट्रॅविस हेडची तुफानी शतकी खेळी, त्याच्यासोबत स्मिथनं केलेली शतकी पार्टीनंतर भारतीय टॉप ऑर्डरमधील गळतीमुळे ऑस्ट्रेलिया या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघानं रोहित शर्माची विकेट अगदी स्वस्तात गमावली. त्यानंतर लोकेश राहुलनं अर्धशतक झळकावलं. पण तो माघारी फिरला आहे. ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत असला तरी चौथ्या दिवशी यजमान संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळे टीम इंडियासाठी फॉलोऑनचं संकट टाळण्याचं आव्हान सोपे झालं आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सिविस्तर   स्टार गोलंदाज झाला दुखापतग्रस्त; कांगारुंच्या ताफ्यातील गोलंदाजीची ताकद झाली कमी

ऑस्ट्रेलिय संघातील स्टार गोलंदाज जोश हेजलवूड हा दुखापतग्रस्त झाला आहे. चौथ्या दिवशी त्याने गोलंदाजीही केली. पण त्याच्या गोलंदाजीत धमक दिसली नाही. मॅच ब्रेकमध्ये त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. त्यामुळे चौथ्या दिवशी तो गोलंदाजीसाठी पुन्हा मैदानात उतरण्याची कमी आहे. ही गोष्ट भारतीय संघासाठी फायद्याची ठरेल. कारण गाबाच्या मैदानात अन्य गोलंदाजांच्या तुलनेत जोश हेजलवूड अधिक घातक ठरू शकतो. हेजलवूड फिल्डवर नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील अन्य गोलंदाजावरील ताण वाढेल.  टीम इंडियाच्या फलंदाजांना टेन्शन फ्री खेळण्याची एक संधी उपलब्ध होईल.

फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची गरज?

भारतीय संघानं ४ बाद ५१ धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. २ तास ५० मिनिटांच्या पहिल्या सेशनमध्ये भारतीय संघानं २ विकेट्सच्या मोबदल्यात ११६ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी अगदी उत्तमरित्या खेळत असून भारतीय संघाने उपहाराआधी धावफलकावर ६ बाद १६७ धावा लावल्या आहेत. फॉलोऑन टाळण्यासाठी भारतीय संघाला २४६ धावा करायच्या आहेत. यासाठी आता फक्त ७९ धावांची गरज आहे. 

 सामना जिंकणं मुश्किल, पण...  ऑस्ट्रेलिया संघानं पहिल्यांदा फंलदाजी करताना धावफलकावर ४४५ धावा केल्या आहेत. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून फक्त लोकेश राहुलच्या बॅटमधून अर्धशतक आले. हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी मुश्किल आहे. पण चौथा दिवस खेळून काढत सामना वाचवण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. जड्डू आणि नितीश कुमार या जोडीवर फॉलोऑन टाळण्याची मोठी जबाबदारी असेल. जर हा टप्पा टीम इंडियानं पार केला तर हा सामना अनिर्णित ठेवण्यात भारतीय संघ यशस्वी ठरू शकतो. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियारवींद्र जडेजारोहित शर्मालोकेश राहुल