IND vs AUS : गुलाबी चेंडू अन् स्टार्कचा जबरदस्त स्टार्ट! असा घेतला यशस्वीचा बदला (VIDEO)

मनावर घेत नाही म्हणत स्टार्कनं घेतला यशस्वीचा बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 10:36 IST2024-12-06T10:35:41+5:302024-12-06T10:36:16+5:30

whatsapp join usJoin us
Australia vs India, 2nd Test Mitchell Starc strikes first ball Yashasvi Jaiswal Golden Duck Pink Ball Test Adelaide | IND vs AUS : गुलाबी चेंडू अन् स्टार्कचा जबरदस्त स्टार्ट! असा घेतला यशस्वीचा बदला (VIDEO)

IND vs AUS : गुलाबी चेंडू अन् स्टार्कचा जबरदस्त स्टार्ट! असा घेतला यशस्वीचा बदला (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS, Mitchell Starc strikes first ball Yashasvi Jaiswal Golden Duck :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी (BGT) स्पर्धेतील दुसरा सामना अ‍ॅडिलेड ओव्हलच्या मैदानात रंगला आहे. प्रकाश झोतात खेळवण्यात येत असलेल्या गुलाबी चेंडूवरील सामन्यात पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कनं यशस्वी जैस्वालला तंबूचा रस्ता दाखवला. पर्थ कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातही त्याच्या पदरी भोपळा पडला आहे.
 

पर्थ कसोटी सामन्यात यशस्वीनं दमदार खेळी करताना कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलेच दमवलं होते. पहिल्या डावात भोपळा पदरी पडल्यावर दुसऱ्या डावात त्याच्या भात्यातून शतकी खेळी आली होती. या सामन्यात युवा यशस्वी जैस्वालनं स्टार्कला खुन्नस दिल्याचा किस्साही चांगलाच चर्चेत आला होता.

चेंडू खूपच स्लो टाकतोस...

पर्थ कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालनं ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कच्या एका चेंडूवर उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चेंडू अगदी संयमीरित्या खेळून काढत भारतीय सलामीवीरानं स्टार्कला टोमणा मारल्याचे पाहायला मिळाले होते. चेंडू खूपच स्लो आहे...अशी कमेंट यशस्वी जैस्वालनं केली होती. हा किस्सा चांगलाच गाजला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत अनुभवी मिचेल स्टार्क विरुद्ध युवा यशस्वी यांच्यात कसा सामना पाहायला मिळणार? याची चर्चा होती. या लढाईत मिचेल स्टार्कनं बाजी मारल्याचे दिसते. गुलाबी चेंडूवर संघाला जबरदस्त सुरुवात करून देताना पहिल्याच चेंडूवर त्याने यशस्वी जैस्वालला पायचित करत तंबूचा रस्ता दाखवला.  

यशस्वीच्या कमेंटवर स्टार्कनं असा दिला होता रिप्लाय

मिचेल स्टार्कनं पिंक बॉल टेस्ट आधी यशस्वी जैस्वालच्या कमेंटवर अगदी संयमी रिप्लाय दिला होता. यशस्वी काय म्हणाला ते ऐकलं नव्हतं. सध्या मी कुणाला काही बोलत नाही. आधी त्याने फ्लिप शॉट खेळला होता आणि मग दुसरा चेंडू मी अगदी तसाच टाकल्यावर त्याने डिफेंन्स केला. त्यावेळी मी त्याल म्हटलं की, फ्लिप शॉट कुठं गेला? त्यावर त्याने स्माइल दिली. तो विषय तिथंच संपला, असे स्टार्कनं म्हटले होते. पण कुणालाही काही बोलत नाही म्हणून दुसऱ्या कसोटीत स्टार्कनं युवा यशस्वीचा काटा काढल्याचे दिसते. 
 

Web Title: Australia vs India, 2nd Test Mitchell Starc strikes first ball Yashasvi Jaiswal Golden Duck Pink Ball Test Adelaide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.