पर्थच्या मैदानात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ४०० पेक्षा अधिक धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुलनं सेट केलेल्या प्लॅट फॉर्मवर विराट कोहलीही रंगात आल्याचे पाहायला मिळाले. यशस्वी-KL राहुल जोडीनं सेट केला नवा विक्रमदुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा डाव १०४ धावांत आटोपल्यावर भारतीय संघानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवसाअखेर १७६ धावा करत नाबाद राहिलेल्या भारताच्या सलामी जोडीनं तिसऱ्या दिवसाच्या खेळात द्विशतकी भागीदारीसह खास विक्रम रचला. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी २०१ धावांची दमदार भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन मैदानात भारतीय संघाच्या सलामी जोडीनेच नव्हे तर एकंदरीत केलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
केएल राहुल यशस्वीनंतर विराटची बॅटही तळपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 13:33 IST