Join us

IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!

टीम इंडियाला मिळाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:26 IST

Open in App

India vs Australia 1st T20I Match Called Off Due To Rain : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कॅनबेरा येथील मनुका ओव्हलच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यावर पावसाने पाणी फेरलं. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या फलंदाजी वेळी सातत्याने पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. शेवटी पाऊस जिंकला अन् पहिली लढत रद्द करण्याची वेळ आली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल जोडी जमली, पण...

पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. भारताच्या धावफलकावर ३५ धावा असताना अभिषेक शर्माच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तो १४ चेंडूत १९ धावा करून तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरेल्या भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं आपल्या भात्यातील फटकेबाजीचा खास नजराणा पेश केला. कर्णधार आणि उप कर्णधार शुबमन गिल जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. पण पावसानं पुन्हा बॅटिंग सुरु केली.

IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला

टीम इंडियाला मिळाला मोठा दिलासापावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी भारतीय संघाने  ९.४ षटकात  एका विकेटच्या मोबदल्यात ९७ धावा केल्या होत्या.  कर्णधार  सूर्यकुमार यादव २४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३९ धावांवर तर उप कर्णधार शुबमन गिल २० चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३७ धावांवर नाबाद खेळत होता. ही टीम इंडियासाठी या सामन्यातील जमेची बाजू ठरली. कारण सूर्यकुमार यादव मागील काही सामन्यांपासून धावांसाठी सघर्ष करताना दिसला होता. तो या मॅचमध्ये फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे वनडेतील फ्लॉप शोनंतर गिल रिदममध्ये दिसला.  वनडे मालिका गमावल्यावर टी-२० मालिकेत पलटवार करण्यासाठी ही गोष्ट टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी ठरेल, अशीच आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rain wins as India vs Australia T20I abandoned after promising start.

Web Summary : The first T20I between India and Australia was called off due to rain. India reached 97/1 in 9.4 overs, with Suryakumar Yadav (39*) and Shubman Gill (37*) looking good. This was a positive sign after the ODI series loss.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार यादवशुभमन गिलटी-20 क्रिकेट