Join us
Daily Top 2Weekly Top 5

Australia Super 8 Qualification Scenarios: ऑस्ट्रेलिया धक्क्यातून सावरु शकेल का? समीकरण अवघड, पण...

या निकालानंतर ऑस्ट्रेलियाची अवस्था ‘तळ्यात-मळ्यात’ झाली आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेने दमदार कामगिरी करत यंदाच्या स्पर्धेत आगेकूच करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 20:08 IST

Open in App

ICC Men's T20 World Cup 2026 Australia Super-8 Qualification Scenarios : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या ‘ब’ गटातील १९व्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियासमोर १७० धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना  मॅट रेनशॉ वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला फलंदाजीत छाप सोडता आली नाही. परिणामी ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली. या निकालानंतर ऑस्ट्रेलियाची अवस्था ‘तळ्यात-मळ्यात’ झाली आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेने दमदार कामगिरी करत यंदाच्या स्पर्धेत आगेकूच करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 चुरस वाढली; ऑस्ट्रेलियनं संघ पडला मागे 

यजमान श्रीलंका आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकत ४-४ गुणांची कमाई केली आहे. नेट रनरेटच्या जोरावर श्रीलंका अव्वल स्थानी आहे, तर झिम्बाब्वे दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने दोनपैकी एक सामना जिंकला असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. आयर्लंड आणि ओमान या दोन्ही संघांचे खाते अद्याप उघडलेले नाही.

झिम्बाब्वेनं दुसऱ्यांदा केली कांगारूंची शिकार! इथं पाहा T20 World Cup इतिहासातील ५ मोठे उलटफेर

ऑस्ट्रेलियासमोर कठीण समीकरण

झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाची सुपर ८मध्ये जाण्याची संधी संपलेली नाही. मात्र त्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. केवळ विजय नव्हे, तर उत्तम नेट रनरेटसह विजय मिळवणे आवश्यक आहे. जर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला हरवले, श्रीलंकेने झिम्बाब्वेला पराभूत केले आणि झिम्बाब्वेने आयर्लंडवर मात केली, तर तिन्ही संघ समान गुणांवर येऊ शकतात. अशा वेळी नेट रनरेट निर्णायक ठरेल.

ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वेने श्रीलंकेला धक्का दिल्यास...

जर ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी श्रीलंकेचा पराभव केला, तर यजमान संघ बाहेर पडू शकतो आणि ऑस्ट्रेलिया व झिम्बाब्वे सुपर ८मध्ये स्थान मिळवू शकतात. मात्र या सर्व समीकरणांची किल्ली ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित सामन्यांतील कामगिरीवर अवलंबून आहे.

इथं पाहा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ब' गटातील गुणतालिका

क्रमांकसंघसामनेविजयपराभवअनिर्णित सामनेगुणनेट रनरेट
श्रीलंका+३.१२५
झिम्बाब्वे+१.९८४
ऑस्ट्रेलिया+१.१००
आयर्लंड-२.१७५
ओमान-४.३०६
English
हिंदी सारांश
Web Title : Australia's Super 8 Hopes Dented: Qualification Scenarios Get Tougher

Web Summary : Zimbabwe's shock victory throws Australia's Super 8 qualification into jeopardy. Australia must win remaining matches with a strong net run rate. Other results also need to favor them to advance. Their fate hinges on upcoming performances.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६आॅस्ट्रेलियाझिम्बाब्वेआयसीसी