AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...

कुठं कधी अन् कोणत्या मैदानात रंगणार वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:10 IST2025-10-01T10:58:49+5:302025-10-01T11:10:35+5:30

whatsapp join usJoin us
AUS W vs NZ W ICC Women’s World Cup 2025 Live streaming and weather forecast When and where to watch in India | AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...

AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : भारत विरुद्ध श्रीलंका या संयुक्त यजमानपद मिरवणाऱ्या दोन संघातील लढतीनं महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झालीये. या स्पर्धेतील दुसरा सामन्यात दोन वर्ल्ड चॅम्पियन संघ एकमेकांना भिडणार आहेत. न्यूझीलंडसमोर गत जेतेपदासह आतापर्यंतच्या इतिहासात ७ वेळचा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असेल. न्यूझीलंडच्या संघानेही एकदा ही स्पर्धा जिंकली आहे, त्यामुळे ते गत चॅम्पियनला कडवी टक्कर देतील, अशी अपेक्षा आहे. इथं एक नजर टाकुयात AUS W vs NZ W यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेतील लढत कधी कुठं रंगणार? या सामन्याचा आनंद कसा घेता येईल अन् कसा आहे वनडेतील दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कुठं कधी अन् कोणत्या दोन संघात रंगणार वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना?

  • स्पर्धा: ICC महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धा २०२५
  • सामना: ऑस्ट्रेलिया महिला vs न्यूझीलंड महिला
  • तारीख: १ ऑक्टोबर २०२५
  • वेळ: दुपारी ३:०० (IST)
  • सामन्याचे ठिकाण : होळकर स्टेडियम, इंदूर
  • टॉस वेळ: दुपारी २:३० (IST)


World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!

कुठं अन् कशी पाहता येईल AUS W vs NZ W यांच्यातील लढत? (AUS W vs NZ W, Live Streaming) 

  • लाइव्ह स्ट्रीमिंग: JioHotstar अ‍ॅप्स आणि वेबसाईट्स
  • टीव्ही प्रक्षेपण:  स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network)

हवामान अंदाज  (Weather Forecast)

गुवाहटीच्या मैदानात रंगलेल्या भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. पण इंदूरच्या मैदानात पावसाची शक्यता फारच कमी आहे.  

ऑस्ट्रेलियाृ न्यूझीलंड महिला संघातील हेड टू हेड रेकॉर्ड ( AUS W vs NZ W ODI Head To Head Record)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील महिला क्रिकेट संघात आतापर्यंत १३५ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने १०२ तर न्यूझीलंडच्या संघाने फक्त ३१ सामने जिंकले आहेत. २ सामने अनिर्णित राहिले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने १३ तर न्यूझीलंडने फक्त ३ सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.

Web Title : AUS W vs NZ W, वर्ल्ड कप 2025: ऑस्ट्रेलिया की कड़ी चुनौती

Web Summary : वर्ल्ड कप 2025 की शुरुआत ऑस्ट्रेलिया बनाम न्यूजीलैंड से। सात बार के चैंपियन ऑस्ट्रेलिया से न्यूजीलैंड को कड़ी चुनौती। मैच 1 अक्टूबर को इंदौर में। JioHotstar और Star Sports पर लाइव देखें। ऑस्ट्रेलिया का हेड-टू-हेड रिकॉर्ड बेहतर।

Web Title : AUS W vs NZ W, World Cup 2025: Australia's Strong Challenge

Web Summary : World Cup 2025 begins with Australia facing New Zealand. Australia, seven-time champions, pose a strong challenge to New Zealand. The match is on October 1st at Indore. Watch live on JioHotstar and Star Sports. Australia dominates head-to-head records.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.