टीम इंडियाचा 'वर्ल्ड चॅम्पियन'वाला रुबाबच नाही दिसला! वनडेत ऑस्ट्रेलियानं दिली एकतर्फी मात

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ज्या ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा दणका दिला होता त्या संघाने भारतीय महिला संघाला एकतर्फी मात दिली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:30 IST2026-02-24T16:25:41+5:302026-02-24T16:30:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
AUS W vs IND W 1st ODI Australia Women Beth Mooney’s classy 76 powers Australia to comfortable win vs India Women | टीम इंडियाचा 'वर्ल्ड चॅम्पियन'वाला रुबाबच नाही दिसला! वनडेत ऑस्ट्रेलियानं दिली एकतर्फी मात

टीम इंडियाचा 'वर्ल्ड चॅम्पियन'वाला रुबाबच नाही दिसला! वनडेत ऑस्ट्रेलियानं दिली एकतर्फी मात

Australia Women vs India Women, 1st ODI : घरच्या मैदानातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेची सुरुवात ही पराभवाने झाली आहे. दशकभराच्या प्रतिक्षेनंतर टी-२० मालिका जिंकल्यावर टीम इंडिया वनडेत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. पण ब्रिस्बेनच्या गाबाच्या मैदानात हरमनप्रीत ब्रिगेडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनवाला तो रुबाबच दिसला नाही. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ज्या ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा दणका दिला होता त्या संघाने भारतीय महिला संघाला एकतर्फी मात दिली. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

फलंदाजीत सपशेल अपय़शी ठरली टीम इंडिया

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण तिचा हा निर्णय सपशेल फोल ठरला. सलामीची बॅटर स्मृती मानधना ५८ (६८),  कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ५३ (८४) या दोघींच्या अर्धशतकानंतर केशवी गौतम हिने ४४ चेंडूत केलेल्या ४३ धावा आणि रिचा घोषनं ३८ चेंडूत २३ धावांचे  दिलेले योगदान याव्यतिरिक्त कुणालाही फलंदाजीत धमक दाखवता आली नाही. परिणामी भारतीय संघ ४८.३ षटकात २१४ धावांवरच आटोपला. 

AUS W vs IND W : टीम इंडियाच्या 'क्वीन'ची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधला 'फिफ्टी प्लस'चा विक्रमी डाव

ऑस्ट्रेलियाने एकतर्फी बाजी मारत वनडे मालिकेत घेतली १-० अशी आघाडी

भारतीय संघाने दिलेल्या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना एलिसा हिली आणि फोबी लिचफिल्ड या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.  फोबी लिचफिल्ड ३२ चेंडूत ३२ धावा करून परतल्यावर एलिसाने ७० चेंडूत ५० धावांचे योगदान दिले. जॉर्जिया वोल हिला या सामन्यात खातेही उघडता आले नाही. पण त्यानंतर विकेट किपर बॅटर बेथ मूनी हिने ७९ चेंडूत ७६ धावांची खेळी करत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. अनाबेल सॅदरलँड हिने ४४ चेंडूत नाबाद ४८ धावा करत ऑस्ट्रेलियन संघाला ३९ व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियन संघाने ६ विकेट्स राखून मोठ्या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत मवनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर कमबॅकचे आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना रविवारी, १ मार्च २०२६ रोजी होबार्टच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यातील चुका सुधारून कमबॅक करण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर असेल. पर्थच्या मैदानात ६ मार्चला या मालिकेतील अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे.

Web Title : ऑस्ट्रेलिया ने वनडे में भारत को हराया, चैंपियन भावना की कमी उजागर।

Web Summary : पहले वनडे में ऑस्ट्रेलिया ने भारत को हराया, मंधाना और कौर के अर्धशतक के बावजूद भारत की बल्लेबाजी में कमजोरी उजागर हुई। ऑस्ट्रेलिया ने 6 विकेट से जीत दर्ज कर सीरीज में 1-0 की बढ़त बनाई। भारत के सामने वापसी की चुनौती।

Web Title : Australia dominates India in ODI, exposing lack of champion spirit.

Web Summary : Australia defeated India in the first ODI, exposing weaknesses in India's batting despite Mandhana and Kaur's half-centuries. Australia chased the target comfortably, winning by 6 wickets and taking a 1-0 lead in the series. India faces a comeback challenge.