Join us

ट्रॅविस हेडची फास्टर फिफ्टी! फक्त २५ चेंडूत केली ८० धावांची स्फोटक खेळी

चौकार षटकारांची आतषबाजी, टी-२० नंबर वन बॅटर ट्रॅविस हेडचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 10:40 IST

Open in App

टी-२० क्रिकेटमधील नंबर वन बॅटर ट्रॅविस हेड हा त्याच्या स्फोटक खेळीनं ओळखला जातो. स्कॉटलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी केली. फक्त १७ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले.

या सामन्यातील २५ चेंडूतील ८० धावांच्या खेळीत त्याने १२ चौकार आणि ५ षटकार मारले. ३२० च्या स्ट्राइक रेटसह केलेल्या या स्फोटक खेळीसह एका डावात त्याने अनेक विक्रम मोडीत काढल्याचे पाहायला मिळाले. 

एडिनबर्ग येथील पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने स्कॉटलंडला ६२ चेंडू आणि ७ विकेट्स राखून पराभूत केले. ट्रॅविस हेडशिवाय  कर्णधार मिचेल मार्श याने या सामन्या १२ चेंडूत ३९ धावा तर  विकेट किपर बॅटर  जोस इंगलिस याने १३ चेंडूत  नाबाद २७ धावांची खेळी केली. 

ऑस्ट्रेलियाकडून फास्टर फिफ्टीचा रेकॉर्ड

    मार्कस स्टोयनिस- १७ चेंडू    ट्रॅविस हेड- १७ चेंडू     डेविड वॉर्नर- १८ चेंडू    ग्लेन मॅक्सवेल- १८ चेंडू    ग्लेन मॅक्सवेल- १८ चेंडू  

सहाव्या षटकात कुटल्या २६ धावा

आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक अंदाजाची झलक दाखवून देणाऱ्या ट्रॅविस हेड याने पॉवर प्लेमध्ये धमाका केला. या सामन्यातील चौथ्या षटकात आधी ऑस्ट्रेलियन कॅप्टन याने चौकार षटकाराची बरसात करत ३० धावा घेतल्या. त्यानंतर सहाव्या षटकात ट्रॅविस हेडनं २६ धावा काढल्या. डावखुऱ्या फलंदाजाने मध्यम जलदगती गोलंदाज  ब्रॅड विल याच्या षटकाची सुरुवात चौकारानं केली. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारल्यावर उर्वरित ४ चेंडूवर त्याने सलग चार चौकार मारले.

कुणाच्या नावे आहे टी-२० तील फास्टर फिफ्टीचा रेकॉर्ड?

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा नेपाळच्या दीपेंद्र सिंह ऐरी याच्या नावे आहे. २०२३ मध्ये मंगोलिया विरुद्धच्या सामन्या त्याने अवघ्या ९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर या यादीत युवराज सिंगचा नंबर लागतो. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्य़ात युवीनं १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटआॅस्ट्रेलिया