Join us

WTC Final : आधी निर्धाव षटकांचा मारा! मग रबाडानं टाकली डबल विकेट ओव्हर; ख्वाजावर ओढावली ही नामुष्की

उस्मान ख्वाजाच्या पदरी भोपळा, नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:56 IST

Open in App

WTC Final 2025 : क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगला आहे. या  सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कगिसो रबाडाने आपल्या कर्णधाराचा हा विश्वास सार्थ ठरवताना ऑस्ट्रेलियाला एकाच षटकात धक्क्यावर धक्के दिले. 

उस्मान ख्वाजाच्या पदरी भोपळा, नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याला फायनल लढतीतील पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. २० चेंडूचा सामना करून तो शून्यावर बाद झाला. डेव्हिड बेडिंगहॅम याने स्लिपमध्ये अप्रतिम कॅचसह त्याचा खेळ खल्लास केला. कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळून खातेही न उघडता तंबूत परतणारा तो चौथा ऑस्ट्रेलिन सलामीवीर ठरला. याआधी डेविड वॉर्नर २२ चेंडूत, शॉन मार्श २१ चेंडू आणि सॅमी जोन्स याच्यावर २० चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. 

आधी निर्धाव षटकांचा मारा, मग रबाडानं एका षटकात दोघांना फसवलं

या सामन्यात रबाडाने पहिल्या तीन षटकात ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना एकही धाव काढू दिली नाही. चौथ्या षटकात त्याने पाच धावा खर्च केल्या, पण दोन विकेट्सचा डावही साधला.ऑस्ट्रेलियाच्या डावातील सातव्या चेंडूतील पहिल्याच चेंडूवर रबाडाने ख्वाजाला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर याच षचकातील शेवटच्या चेंडूवर त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला कॅमरून ग्रीनही स्लिपमध्ये कॅच आउट झाला. एडन मार्करम याने सर्वोत्तम कॅच घेत त्याच्या इनिंगला ब्रेक लावला. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाद. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया