Join us

AUS vs SA Live: डेव्हिड वॉर्नरनं मैदान गाजवलं अन् रबाडाने मनं जिंकली; लाईव्ह सामन्यातच प्रेक्षकांसोबत धरला ठेका

सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:56 IST

Open in App

नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. सोमवारपासून या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत कांगारूच्या गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. कॅमेरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेच्या डावात 5 बळी घेऊन आफ्रिकेला मोठे धक्क दिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या पहिल्या डावात 68.4 षटकांत 189 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या डावाची शानदार सुरूवात केली. 

दरम्यान, निराश झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांना जागे करण्याचे काम कगिसो रबाडाने केले. रबाडाने लाईव्ह सामन्यातच प्रेक्षकांसोबत डान्स करून सामन्यात रंगत आणली. याशिवाय प्रेक्षकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम रबाडाने केले. सध्या आफ्रिकेचा संघ सामन्यात संघर्ष करत आहे. फलंदाजी फ्लॉप ठरल्यानंतर आफ्रिकन गोलंदाजांना देखील अद्याप साजेशी कामगिरी करता आली नाही. कगिसो रबाडाने कांगारूचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला तंबूत पाठवले. मात्र वॉर्नर-स्मिथच्या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 254 चेंडूत 200 धावांची द्विशतकी खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथला शतकाला मुकला आणि 85 धावांवर बाद झाला. कांगारूच्या संघाने 91 षटकांत 3 बाद 386 एवढ्या धावा केल्या आहेत. वॉर्नरने दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशत झळकावून इतिहास रचला आहे. 

वॉर्नरने रचला इतिहास 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा वॉर्नर जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी केवळ इंग्लंडच्या जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला होता. याशिवाय त्याने कसोटीत सलामीवीर म्हणून 8000 धावाही पूर्ण केल्या. लिस्टर कुक, सुनील गावस्कर ग्रॅमी स्मिथ, मॅथ्यू हेडन, वीरेंद्र सेहवाग, जेफ्री बॉयकॉट यांच्यानंतर हा आकडा गाठणारा तो सातवा खेळाडू ठरला आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड. 

दुसऱ्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - डीन एल्गर (कर्णधार), सारेल एरवी, थेउनिस डे ब्रुन, टेम्बा बवुमा, खाया झोंडो, काइल व्हेरेने (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्तजे, लुंगी एनगिडी.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

टॅग्स :द. आफ्रिकाआॅस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरसोशल व्हायरल
Open in App