ग्लेन मॅक्सवेलच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात एक चेंडू अन् २ विकेट्स राखत विजय नोंदवत मालिका खिशात घातलीये. क्वीन्सलँड येथील कॅझली स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रेविसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ७ बाद १७२ धावा करत यजमान ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२ चेंडूत ४ धावांची गरज असताना मॅक्सवेलनं घेतली रिस्क, अन्...
या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं ३७ चेंडूत अर्धशतक झळकावले. एका बाजूला तो दमदार बॅटिंग करत असताना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूनं ऑस्ट्रेलियाच्या तगड्या फलंदाजीला सुरुंग लावला. पण मॅक्सवेल मात्र सर्वांना पुरून उरला. अखेरच्या षटकात २ विकेट्स हातात असताना ऑस्ट्रेलियाला १० धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूवर ६ धावा घेतल्यावर अखेरच्या २ चेंडूत ऑस्ट्रेलियाला ४ धावांची गरज होती. सामना रंगतदार अवस्थेत असताना पाचव्या चेंडूवर रिव्हर्स स्विप फटका मारत मॅक्सवेलनं संघाचा विजय निश्चित केला. या सामन्यासह ऑस्ट्रेलियन संघाने ३ सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली.