Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

ऑस्ट्रेलियन मैदानातील सर्वात जलद अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:28 IST2025-08-16T18:22:33+5:302025-08-16T18:28:38+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs SA 3rd T20I Dewald Brevis Hits Fastest Fifty Against Australia Break Ravi Bopara Record | Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs SA 3rd T20I Dewald Brevis Hits Fastest Fifty Against Australia : दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील युवा बॅटर डेवाल्ड ब्रेविस याच्या भात्यातून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत सलग दुसरी वादळी खेळी पाहायला मिळाली. शतकी खेळीनंर या पठ्ठ्यानं  कॅजलीज स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी अर्धशतक झळकावले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

अवघ्या २२ चेंडूत अर्धशतक झळकावत त्याने ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी -२० सामन्यात डेवाल्ड ब्रेविस याने एरॉन हार्डीच्या एका षटकात चार षटकार मारले. नेथन एलिस याने  ब्रेविसच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. त्याने त्याने २६ चेंडूत ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.  

ऑस्ट्रेलियन मैदानातील सर्वात जलद अर्धशतक

२२ चेंडूतील अर्धशतकासह डेवाल्ड ब्रेविस हा ऑस्ट्रेलियन मैदानात कांगारुंच्या संघाविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकवणारा फलंदाज ठरलाय. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या रवी बोपाराच्या नावे होता. इंग्लंडच्या ताफ्यातून खेळताना २०१४ मध्ये होबार्टच्या मैदानात त्याने २३ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. जेपी ड्युमिनी याने इथं ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्याचा रेकॉर्ड आहे. २००९ मध्ये त्याच्या भात्यातून ही खेळी आली होती. 

या ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर कमी पडला

एबी डिव्हिलियर्सप्रमाणेच मैदानातील कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता असल्यामुळे डेवाल्ड ब्रेविसला बेबी एबी या नावाने ओळखले जाते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दोन सामन्यात त्याने धमाकेदार इनिंग खेळून आपल्यातील धमकही दाखवलीये. ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांची त्याने धुलाई केली. पण नेथन एलिस विरुद्ध तो कमी पडला. ब्रेविसनं आतापर्यंत दोन डावात या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे पाच चेंडू खेळले आहेत. यात ३ धावा करत दोन वेळा तो बाद झालाय.

Web Title: AUS vs SA 3rd T20I Dewald Brevis Hits Fastest Fifty Against Australia Break Ravi Bopara Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.