David Warner: चोरीला गेलेली वॉर्नरची 'बॅगी ग्रीन' कॅप मिळाली; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं मानलं आभार

david warner retirement: वॉर्नरने नववर्षाच्या सुरूवातीला क्रिकेट विश्वाला धक्का देत वन डे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 02:00 PM2024-01-05T14:00:01+5:302024-01-05T14:00:23+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs PAK 3rd teat australia's player David Warner finds lost Baggy Green, shares emotional video | David Warner: चोरीला गेलेली वॉर्नरची 'बॅगी ग्रीन' कॅप मिळाली; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं मानलं आभार

David Warner: चोरीला गेलेली वॉर्नरची 'बॅगी ग्रीन' कॅप मिळाली; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं मानलं आभार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने नववर्षाच्या सुरूवातीला क्रिकेट विश्वाला धक्का देत वन डे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. हा सामना वॉर्नरच्या कारकिर्दीतील देखील शेवटचा सामना आहे. वन डेमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर वॉर्नरने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला असून भावनिक आवाहन केले होते. खरं तर वॉर्नरची बॅकपॅक गायब झाली होती, ज्यामध्ये ऐतिहासिक बॅगी ग्रीन कॅप देखील होती. मात्र, आता ही कॅप मिळाली असून वॉर्नरने समाधान व्यक्त केले आहे. 

कॅप परत मिळाल्यानंतर वॉर्नरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले, "माझी बॅगी माझ्या हातात परत आल्याचा मला आनंद आहे आणि खूप दिलासा मिळाला. कॅप किती खास असते हे प्रत्येक क्रिकेटपटूला माहिती असते... मला ही कॅप आयुष्यभर सोबत ठेवायची आहे. ती शोधण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचा मी खूप आभारी आहे. संघातील खेळाडू, माल वाहतूक करणारे सहकारी, हॉटेल कर्मचारी आणि संघ व्यवस्थापनाचा मी आभारी आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी माझ्या खांद्यावरील बरेच वजन उचलले आहे. मी त्यांचे खरोखर कौतुक करतो म्हणून तुम्हा सर्वांचे आभार."

वॉर्नरचा वन डे क्रिकेटमधून निवृत्ती 
डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. त्याच्या वन डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १६१ सामन्यांच्या १५९ डावांमध्ये एकूण ६९३२ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १७९ राहिली. त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून २२ शतके आणि ३३ अर्धशतके झाली आहेत. त्याला वन डे कारकिर्दीत ७३३ चौकार आणि १३० षटकार मारण्यात यश आले. 

Web Title: AUS vs PAK 3rd teat australia's player David Warner finds lost Baggy Green, shares emotional video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.