Join us  

डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीने पाकिस्तानी गोंधळले; सैरभैर झाले अन् बरेच चुकले, Video

AUS vs PAK 1st Test : डेव्हिड वॉर्नरने पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी पार बेक्कार धुलाई करून टाकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 4:08 PM

Open in App

AUS vs PAK 1st Test : डेव्हिड वॉर्नरने पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी पार बेक्कार धुलाई करून टाकली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करत असलेल्या वॉर्नरने आजपासून सुरू झालेल्या कसोटीत खणखणीत दीडशतकी खेळी केली. त्याच्या फटकेबाजीने पाकिस्तानी खेळाडूंना काहीच सुचेनासे झाले होते. त्यांच्याकडून झेल काय सुटले अन् सोपा रन आऊटही त्यांना करता आला नाही. एकंदर कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखताना ५ बाद ३४६ धावा कुटल्या.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले. शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर ख्वाजा व वॉर्नर या दोघांनाही जीवदान मिळाले. पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांकडून सोपे झेल टाकले गेले आणि समालोचन करणारे वसीम अक्रम संतापले. ३०व्या षटकात शाहीनला ही जोडी तोडण्यात यश आले आणि ख्वाजा ४१ धावांवर झेलबाद झाला. मार्नस लाबुशेनला ( १६) फहीम अश्रफने पायचीत केले. स्टीव्ह स्मिथ व वॉर्नरने चांगली भागीदारी केली.

खुर्रम शहजादने ५७व्या षटकात स्मिथला ( ३१) माघारी पाठवले, परंतु फॉर्मात असलेला ट्रॅव्हिस हेड चांगला खेळला. त्याने ४० धावा चोपल्या. वॉर्नर एका बाजूने चांगली फटकेबाजी करत होता. पहिल्या चेंडूपासून क्रिजवर उभा असलेला वॉर्नर ७५व्या षटकात बाद झाला. आमीम जमालने त्याला बाद केले. वॉर्नरने २११ चेंडूंत १६ चौकार व ४ षटकारांसह १६४ धावांची वादळी खेळी केली. 

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरपाकिस्तानजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा