Join us

AUS vs Oman : ओमानला 'एकटा बास'! मार्कस स्टॉयनिसचा सुपर शो; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

AUS vs Oman Live : ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव करून ट्वेंटी-२० विश्वचषकात विजयी सलामी दिली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 09:57 IST

Open in App

AUS vs Oman Live Match Updates : बलाढ्य ऑस्ट्रेलियाने नवख्या ओमानचा पराभव करून ट्वेंटी-२० विश्वचषकात विजयी सलामी दिली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना ओमानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी केली. पण, मार्कस स्टॉयनिसच्या खेळीने ऑस्ट्रेलियाने सन्मानजनक धावसंख्या उभारली. कांगारूंना २० षटकांत १६४ धावांवर रोखण्यात ओमानला यश आले. पण, या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानचा संघ चीतपट झाला आणि त्यांना ३९ धावांनी पराभव पत्करावा लागला. ओमान निर्धारित २० षटकांत ९ बाद केवळ १२५ धावा करू शकला. आयन खान (३६) आणि मेहरान खान (२७) वगळता एकाही ओमानच्या फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. 

फलंदाजीत कमाल केल्यानंतर गोलंदाजीतही मार्कस स्टॉयनिसचा वरचष्मा पाहायला मिळाला. त्याने अष्टपैलू कामगिरी करताना तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड आणि ॲडम झाम्पा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 

स्टॉयनिसचा सुपर शोतत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६४ धावा करून ओमानला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांना स्वस्तात बाद करण्यात ओमानला यश आले. पण, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिस यांनी आपल्या संघाला तारले. ५१ चेंडूत ५६ धावा करून वॉर्नरने सावध खेळी केली. तर स्टॉयनिसने स्फोटक खेळी करताना षटकारांचा पाऊस पाडला. त्याने ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३६ चेंडूत नाबाद ६७ धावा केल्या. ओमानकडून मेहरान खानने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर बिलाल खान आणि कलीमुल्लाह यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

ऑस्ट्रेलियाचा संघ -मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड. 

ओमानचा संघ -आकिब इलियास (कर्णधार), कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले, जीशान मकसूद, खालिद कैल, अयान खान, शोएब खान, मेहरान खान, शकील अहमद, कलीमुल्लाह, बिलाल खान.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आॅस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नर