Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना विराट, ना स्मिथ... 2019मध्ये मार्नस लॅबुश्चॅग्नेची बॅट तळपली, कसोटीत विक्रमाला गवसणी

मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे यांनीही टीम इंडियाच्या कर्णधाराला मागे टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 16:51 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 416 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा पहिला डाव 166 धावांत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 251 धावांची आघाडी घेऊन पुन्हा मैदानावर फलंदाजीस उतरण्याचा निर्णय घेतला. या दुसऱ्या डावात डेव्हीड वॉर्नरनं एका विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत 7000 धावा करणारा तो 12वा फलंदाज ठरला. 19व्या धावांवर वॉर्नर माघारी परतला. पण, त्यानंतर मार्नस लॅबुश्चॅग्नेनं ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांनाही 2019मध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही. 

2018मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पदार्पण करणार्या मार्नसनं 2019 हे वर्ष गाजवलं. त्यानं घरच्या मैदानावर सलग तीन कसोटीत शतकी खेळी करताना संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत त्यानं अनुक्रमे 185 व 162 धावांची खेळी केली. त्यात आता न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या डे नाइट कसोटीतील पहिल्या डावातही त्यानं 143 धावा चोपल्या. त्यानं 240 चेंडूंत 18 चौकार व 1 षटकार खेचून 143 धावा केल्या. दुसऱ्या डावातही त्यानं सातत्यपूर्ण खेळ करताना अर्धशतकी खेळी केली. 

या कामगिरीसह त्यानं 2019मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. 2019मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. विराट कोहली अन् स्टीव्ह स्मिथ यांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही. मार्नसनं 10 सामन्यांत 3 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावताना 1022* धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहेत. 

2019मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • मार्नस लॅबुश्चॅग्ने 10 सामने - 1022 धावा
  • स्टीव्ह स्मिथ 7 सामने - 857 धावा
  • जो रूट 11 सामने - 774 धावा
  • बेन स्टोक्स 10 सामने- 772 धावा
  • मयांक अग्रवाल    8 सामने -754 धावा
  • रोरी बर्न्स    11 सामने - 731 धावा
  • डेव्हीड वॉर्नर 8 सामने - 646 धावा
  • अजिंक्य रहाणे 8 सामने - 642 धावा
  • विराट कोहली 8 सामने - 612 धावा

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियान्यूझीलंडविराट कोहलीस्टीव्हन स्मिथअजिंक्य रहाणेमयांक अग्रवालडेव्हिड वॉर्नर