ICC T20 World Cup Paul Stirling Retired Hurt : श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवरील आयर्लंडविरुद्धच्या लढतीनं ऑस्ट्रेलियन संघाने यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या माहिमेची सुरुवात केली. या सामनयात नाणेफेकीआधी ऑस्ट्रेलियन कर्णधार संघाबाहेर झाला. त्यानंतर सामन्यादरम्यान आयर्लंडच्या कर्णधारावर मैदान सोडण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी टॉसआधी ऑस्ट्रेलियन कॅप्टन 'आउट'
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात करण्याआधी ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के बसल्याचे पाहायला मिळाले. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड यासारखे तगडे खेळाडू दुखापतीनंतर टीम डेविड पहिल्या काही सामन्यांना मुकणार हे कर्णधार मिचेल मार्शनं स्पष्ट केले. पण आयर्लंडविरुद्धच्या सलामीच्या लढतीतून टॉस आधी ऑस्ट्रेलियन कॅप्टन मिचेल मार्शही दुखापतीमुळे संघाबाहेर झाला.
T20 World Cup : SA vs AFG यांच्यातील 'सुपर मॅच'मध्ये 'रिस्टबँड'वरून राडा? नेमकं काय घडलं?
धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या कॅप्टनवर एक चेंडू खेळून मैदान सोडण्याची वेळ
ट्रॅविस हेडच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आयर्लंडसमोर १८३ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा कर्णधार आणि संघाच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ असलेला पॉल स्टर्लिंगनं एक चेंडूचा सामना करून लंगडत लंगडत मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. तो रिटायर्ड हर्ट (Retired Hurt) होऊन परतल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानात सामन्याआधी एका संघाचा कर्णधार आउट झाल्यावर सामन्यादरम्यान दुसऱ्या संघाचा कर्णधार दुखापतीमुळे बाहेर पडण्याची कदाचित ही पहिलीच वेळ ठरली.
फिल्डिंग वेळी अफलातून कॅच घेत लुडली होती मैफिल
ऑस्ट्रेलियाचा कार्यवाहू कर्णधार ट्रॅविस हेड याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने जॉश इंग्लिसच्या साथीनं ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. हेड ७ धावांवर धावबाद झाल्यावर जॉश इंग्लिसने तुफान फटकेबाजी केली. त्याच्या आक्रमक फलंदाजीला लगाम लावताना आयर्लंडच्या कर्णधारानं जबरदस्त झेल टिपत मैफिल लुटल्याचे पाहायला मिळाले. जॉश इंग्लिसनं १७ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३७ धावा केल्या. मॅट रॅन शो ३७ (३३) आणि मार्कस स्ट़यनिसच्या ४५ (२९) खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात ६ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारली. पण या धावांचा पाठलाग करताना कर्णधाराने पहिल्याच चेंडू खेळून मैदान सोडल्यामुळे आयर्लंडने इथंच निम्मी लढाई हारली.
Web Summary : Unprecedented! Australia's captain missed the toss due to injury. Ireland's captain, Paul Stirling, retired hurt after facing one ball chasing 183. Australia set the target after Head's 7, Inglis's 37, Stoinis's 45.
Web Summary : अभूतपूर्व! चोट के कारण ऑस्ट्रेलिया के कप्तान टॉस में नहीं आए। 183 रनों का पीछा करते हुए आयरलैंड के कप्तान पॉल स्टर्लिंग एक गेंद खेलकर रिटायर्ड हर्ट हो गए। हेड के 7, इंग्लिस के 37 और स्टोइनिस के 45 रनों की बदौलत ऑस्ट्रेलिया ने लक्ष्य रखा।