AUS vs IND, Yashasvi Jaiswal Wicket DRS Controversy : ऑस्ट्रेलिया संघानं मेलबर्नच्या मैदानात रंगलेला कसोटी सामना जिंकत टीम इंडियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलीये. ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या ३४० धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालनं एकट्यानं खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. तो जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत भारतीय संघ हा सामना किमान अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरेल, असे वाटत होते. पण त्याची विकेट पडली अन् ऑस्ट्रेलियानं सामन्यावरील आपली पकड मजबूत केली.
ऑस्ट्रेलियानं रडीचा डाव खेळून मॅच जिंकली?
भारतीय संघाच्या धावफलकावर १४० धावा असताना यशस्वी जैस्वालची विकेट पडली. पण त्याची विकेट बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात कळीचा मुद्दा ठरली. मैदानातील पंचांनी नॉट आउट दिल्यावर कोणताही ठोस पुरावा नसताना थर्ड अंपायरनं निर्णय बदलून त्याला आउट दिले. थर्ड अंपायरचा हा निर्णय ऑस्ट्रेलियानं रडीचा डाव खेळून मॅच जिंकली का? असा प्रश्न निर्माण करणारी आहे.
यशस्वीला मैदानातील पंचांनी दिलं नॉट आउट; थर्ड अंपायरनं बदलला निर्णय
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील ७१ व्या षटकात पॅट कमिन्सच्या षटकातील पाचव्या चेंडूवर यशस्वी जैस्वालनं एक फटका मारण्याचा प्रयत्न केला. युवा भारतीय सलामीवीर हा फटका खेळताना चुकला अन् चेंडू विकेट किपरच्या हाती विसावला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी झेलबादची अपील केल्यावर मैदानातील पंचांनी त्याला नॉट आउट दिले. त्यानंतर पॅट कमिन्सनं त्याच्या विकेट्सचे महत्त्व लक्षात घेत DRS घेतला अन् हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला. टीम इंडियासाठी हा मोठा धक्काच होता.
यशस्वीच्या विकेट्सचा मुद्दा ठरतोय कळीचा मुद्दा, कारण... टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालसंदर्भातील थर्ड अंपायरनं दिलेला निर्णय हा वादग्रस्त ठरताना दिसतोय. कारण पुन्हा पुन्हा रिप्ले पाहिल्यावर बॅट आणि बॉल याचा संपर्क झाल्याचे स्निकोमध्ये स्पॉट झाले नाही. पण थर्ड अंपायरने या परिस्थितीत आपल्या अधिकाराचा वापर करत आउट असल्याचे दिसते, याआधारावर यशस्वीला बाद ठरवले. त्यामुळे हा निर्णय वादग्रस्त ठरत आहे. यशस्वी जैस्वाल हा एकदम सेट झाला होता. तो असता तर टीम इंडियाला मॅच वाचवणं शक्य झाले असते. त्याने २००८ चेंडूत ८४ धावांची खेळी केली.