Join us

इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

टीम इंडियातील दोन्ही स्टार क्रिकेटच्या मैदानातून दूर असले तरी ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 18:51 IST

Open in App

आशिया कप स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३ वनडे आणि ५ सामन्यांची कसोटी सामना खेळणार आहे. हा दौरा हिटमॅन रोहित शर्मासह माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खास असणार आहे. दोन्ही दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय टी-२० सह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ही जोडगोळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅख करताना दिसत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इथं रोहित अलिशान कारमध्ये स्पॉट झाला, तिकडं विराट सरावाला लागला

टीम इंडियातील दोन्ही स्टार क्रिकेटच्या मैदानातून दूर असले तरी ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. दोघांच्या वनडेतील भविष्याबद्दल चर्चा सुरु असताना हिटमॅन रोहित शर्मा मुंबईच्या रस्त्यावरून लॅम्बोर्गिनीतून फेरफटका मारायला बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे सुट्टीच्या काळात इंग्लंडमध्ये बस्तान बसवणारा विराट कोहलीनं क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरु केलीये. रोहित आणि विराट दोघेही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अखेरचा आंतरारष्ट्रीय सामना खेळले होते. 

मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्...

कोहलीनं कसली कंबर; इंग्लंडमधील खास फोटो व्हायरल

विराट कोहलीनं काही दिवसांपूर्वीच गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिकष्क नईम अमीन यांच्यासोबत इनडोअर ट्रेनिंग सेशन करत असल्याची गोष्ट इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केली होती. त्यानंतर आता लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानातील सरावासाठी पोहचले त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे फोटो व्हायरल होत  आहेत त्यात तो चाहत्यांना सेल्फी देताना पाहायला मिळते. 

कधी रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाचा पहिला वनडे सामना १९ ऑक्टोबरला पर्थच्या मैदानात नियोजित आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबरला दोन्ही संघ अ‍ॅडलेडच्या मैदानात दुसरा सामना खेळतील. याच महिन्यातील २५ तारखेला सिडनीच्या मैदानातील सामन्यासह या दौऱ्याची सांगता होईल. तीन वनडे सामन्यात दोन भारतीय दिग्गज कशी कामगिरी करणार? हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ