Join us

AUS vs IND : किंग कोहलीच्या भात्यातून 'विराट' खेळी येणार? इथं पाहा MCG वरील त्याचा रेकॉर्ड

विराट कोहली दमदार कमबॅक करणार का? इथं पाहा त्याची MCG वरील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 19:18 IST

Open in App

Virat Kohli record at Melbourne Cricket Ground: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसर ट्रॉफी स्पर्धेतील चौथा सामना मोलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणार आहे. बॉक्सिंग डे टेस्टसाठी भारतीय क्रिकेट संघ मेलबर्नला पोहचला देखील आहे. ब्रिस्बेनमधील कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे ५ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

पुन्हा विराटवर असतील साऱ्यांच्या नजरा 

भारतीय संघानं आपल्या पहिल्या तीन लढती या ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला असलेल्या पर्थ, अ‍ॅडिलेड आणि ब्रिस्बेनच्या मैदानात खेळल्या. या तीन सामन्यातील लढतीनंतर मालिका १-१ बरोबरीत असल्यामुळे भारतीय संघानं लढाई अर्धी जिंकल्यासारखी आहे. आता मेलबर्नच्या मैदानात टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पुन्हा एकदा साऱ्यांच्या नजरा या किंग कोहलीवर असतील. कारण मेलबर्नच्या मैदानात कोहलीचा रेकॉर्ड एकदम झक्कास राहिला आहे. एक नजर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील किंग कोहलीच्या कामगिरीवर

विराट कोहली कमबॅक करणार?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाी. ३ सामन्यातील ५ डावात त्याने १२६ धावा केल्या आहेत. पर्थच्या मैदानातील १०० धावांची खेळी बाजूला काढली तर ४ डावात कोहलीनं फक्त २६ धावाच केल्या आहेत. कोहलीची ही आकडेवारी मेलबर्नच्या मैदानात बदलू शकते. कारण इथं त्याचा रेकॉर्ड एकदमच भारी राहिला आहे. त्यामुळेच तो इथं दमदार कमबॅक करेल, अशा अशा आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील किंग कोहलीचा रेकॉर्ड

मेलबर्नच्या मैदानात विराट कोहलीनं आतापर्यंत ३ सामन्यातील ६ डावात २ च्या सरासरीनं ३१६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या भात्यातून एक शतक आणि २ अर्धशतकेही पाहायला मिळाली आहेत. मेलबर्नच्या मैदानात १६९ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. २०१८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो या मैदानात अखेरचा सामना खेळला होता. आता पुन्हा या मैदानात आपला जलवा दाखवण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया